India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली, बॉलीवूड कलाकार आहेत अतिशय कंजूस, कुणीच पार्ट्यांमध्ये…..

India Darpan by India Darpan
March 19, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील कलाकार हे त्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांचा स्वभाव आणि त्याहीपेक्षा त्यांच्या तऱ्हेवाईकपणासाठी जास्त ओळखले जातात. कायम चर्चेत राहण्यासाठी अनेकदा हा फंडा हाताळला जातो. अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनयासाठी जास्त लक्षात राहतात. तर राखी सावंत, उर्फी जावेदसारख्या काही मॉडेल्स या त्यांच्या तोंडाळपणासाठी जास्त लक्षात राहतात. यामुळे त्यांचा हा स्वभाव कामाचा तर कधी कळीचा मुद्दा ठरतो.

अभिनेत्री तापसी पन्नू देखील आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. इंडस्ट्रीत आउटसाइडर असलेल्या तापसीने टॅलेंटच्या जोरावर यश मिळवलं आहे. मात्र, नुकतंच तापसीने बॉलीवूडबाबत एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. बॉलीवूड कलाकार कंजूस असून पार्ट्यांना जाताना कलाकार रिकाम्या हाताने जात असल्याचे ती म्हणाली आहे.

कोणतीही बॅकग्राऊंड नसताना या क्षेत्रात आलेल्या तापसीने अनेकदा आपल्या विधानांतून बॉलीवूडची पोलखोल केली आहे. एका मुलाखतीत तापसी म्हणाली फिल्म इंडस्ट्रीतील पार्ट्या कितीही ग्रँड का असेना सर्व कलाकार रिकाम्या हातीच जातात. कोणीच कसलीच भेटवस्तू घेऊन जात नाही. मग कोणाचा वाढदिवस असो किंवा कशाचं सेलिब्रेशन असो. फिल्म इंडट्रीतले लोक थोडे विचित्र असतात. त्यांच्या पद्धती वेगवगेळ्या असतात. कोणीही एखाद्या कलाकाराच्या घरी बर्थ डे किंवा दिवाळी पार्टीसाठी गेले तर कोणतंही गिफ्ट घेऊन जात नाही.

तापसी म्हणाली, मी शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. मात्र शाहरुखकडे तर सगळेच आहे त्याला काय गिफ्ट देणार ? असा प्रश्न मला पडला. त्याला एखाद पुस्तक जरी द्यायचं म्हटलं तरी त्याला ते आवडणार का ? आणि जर त्याला ते नाही आवडलं तरी तो पुढच्या वेळी आपल्याला पार्टीला बोलवणार नाही, अशी भीती देखील असते. तापसीने शाहरुखशिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी झालेल्या पार्टीबद्दल सुद्धा खुलासा केला.

ती म्हणाली अमितजींच्या घरी सर्व रिकाम्या हातीच जातात. माझ्या करिअरच्या सुरुवातीला पार्ट्यांमध्ये गिफ्ट घेऊन जाणारी मी एकटीच होते. मग एक दिवस मी देखील गिफ्ट घेऊन जाणे बंद केले. तरी, गिफ्ट घेऊन गेलं नाही तर आपल्याला पुन्हा पार्टीला बोलावतील की नाही, अशी भीती वाटायची. पण नंतर हा ट्रेंड लक्षात आल्यानंतर मीही गिफ्ट घेऊन जाणे बंद केलं, असं ती सांगते. शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ या सिनेमामध्ये तापसी दिसणार आहे. हा सिनेमा राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला आहे.

Actress Tapsee Pannu on Bollywood Celebrity


Previous Post

बागेश्वर बाबांना आणखी एक चॅलेंज.. आता थेट ३० लाख देणार.. कोण आणि कशासाठी

Next Post

BCCI अध्यक्ष होणार का? वन डे क्रिकेट बोअरिंग का वाटते? मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला…

Next Post

BCCI अध्यक्ष होणार का? वन डे क्रिकेट बोअरिंग का वाटते? मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला...

ताज्या बातम्या

महारेराच्या अंमलबजावणीवर उठताहेत प्रश्न…बिल्डरांवर काही कारवाई होतेय का…

October 2, 2023

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

October 2, 2023

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

October 2, 2023

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

October 2, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे, जाणून घ्या.. ३ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 2, 2023

येवल्यात मुसळधार पाऊस; दुकान व घरात पाणी शिरले, दुचाकी रस्त्यावर आडव्या झाल्या (बघा व्हिडिओ)

October 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group