मुंबई – बॉलीवूड सेलिब्रिटी असो की क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू यांच्या वेशभूषाबद्दल तसेच ज्वेलरी आणि अन्य वस्तूंविषयी सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच उत्सुकता वाटते, तसेच त्याबद्दल जनमानसात कायमच चर्चा होत असते. एखाद्या खेळाडूने किंवा कलाकाराने परदेशातून मौल्यवान वस्तू आणल्यावर त्याला कस्टम ड्युटी भरावी लागते, परंतु सदर टॅक्स भरण्यास हे सेलिब्रिटी टाळाटाळ करतात, असे दिसून येते. सध्या एका भारतीय खेळाडूने परदेशातून आणलेल्या एका मौल्यवान वस्तू विषयदेखील अशीच चर्चा रंगली आहे.
दुबईतील टी-20 विश्वचषक क्रिकेट 2021 मध्ये भारताचा खेळ संपल्यानंतर, टीम इंडियासोबत दुबईहून मुंबईला परतलेल्या हार्दिक पांड्याकडून सीमा शुल्क विभागाने विमानतळावर दोन महागडी घड्याळे जप्त केली आहेत. त्यांच्या या घड्याळांची किंमत सुमारे 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. मात्र, हार्दिक पांड्याच्या म्हणण्यानुसार, घड्याळाची किंमत 5 नाही तर सुमारे 1.5 कोटी आहे.
याबाबात हार्दिकने ट्विटमध्ये लिहिले की, ‘सोमवार ( दि. 15 नोव्हेंबर) पहाटे दुबईहून मुंबईला आल्यानंतर मी माझे सामान घेतले आणि नंतर स्वतः कस्टम काउंटरवर गेलो. जिथे मी सामान घोषित केले म्हणजेच त्याची माहिती दिली, परंतु मुंबई विमानतळावर माझे सामान मी घोषित केले नाही, अशा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. मात्र मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. तसेच सरकारच्या सर्व यंत्रणांचा मी आदर करतो.
माझ्याबद्दल सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. मी स्वतः विमानतळावर उपस्थित असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सर्व सामानाची माहिती दिली आहे. कस्टम विभागाने माझ्याकडे सर्व कागदपत्रे मागितली. सध्या ते त्यांच्या योग्य कर्तव्याचे मूल्यमापन करण्यात गुंतले आहेत. मी पूर्ण शुल्क भरण्यास तयार असून सोशल मीडियावर घड्याळाची जी किंमत 5 कोटी रुपये सांगितली जात आहे ती चुकीची आहे. या घड्याळाची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे.
हार्दिक पांड्याला महागडी घड्याळे वापरण्याचा शौक आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये Philippe, Nautilus, Platinum, 5711 सारखे घड्याळ देखील आहे, जी जगातील निवडक व्यक्तींच्याकडेच आहेत. याशिवाय तो त्याच्या लग्झरीयस लाइफस्टाइलसाठीही ओळखला जातो. त्याच्याकडे लक्झरी फॅशन ब्रँडची अनेक उत्पादने आहेत.
2021 च्या टी – 20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरी निराशाजनक होती. त्याने कोणतीही प्रभावी खेळी खेळली नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे हार्दिकच्या अपयशानंतर त्याच्या निवड आणि फिटनेसवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी- 20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियात त्याची निवड झाली नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला T20 सामना जयपूरमध्ये खेळवला जात आहे. पांड्याने केलेला खुलासा खालीलप्रमाणे