विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सध्याच्या काळात नेट कॅश म्हणजे रोख पैसे खिशात बाळगणे असुरक्षित मानले जाते. त्यामुळे सहाजिकच प्रत्येकाला ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज भासते. त्याकरिता आपल्याकडे क्रेडिट कार्ड असावे, असे अनेक जणांना वाटते. परंतु बऱ्याच वेळा पगार कमी असल्यामुळे बँक किंवा अर्थविषयक व्यवहार करणाऱ्या काही संस्था क्रेडिट कार्ड देत नाहीत, परंतु आता आपल्या विना अट क्रेडिट कार्ड मिळू शकते
अनेक वेळा सिबिलच्या वाईट स्कोअरमुळे किंवा कमी पगारामुळे लोकांना क्रेडिट कार्ड मिळवता येत नाही. परंतु फिनटेक स्टार्टअप स्लाईसने अशा लोकांसाठी खास प्रकारचे क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. त्यामुळे प्रत्येकाला हे क्रेडिट कार्ड मिळू शकते. याबाबत जाणून घेऊ या…
– सिबिल मर्यादा किती असेल: सदर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कार्डची क्रेडिट मर्यादा किमान 2 हजार रुपये आहे. भारतीय क्रेडिट कार्ड बाजारातील ही सर्वात कमी मर्यादा आहे. आतापर्यंत स्लाईसने त्याच्या कार्डावर किमान 10 हजार रुपये मर्यादा निश्चित केली होती. मात्र आता 2 हजारांच्या मर्यादेसह कार्डाचा लाभ ज्यांचा पगार कमी आहे किंवा ज्यांचा सिबिल स्कोअर वाईट आहे, त्या लोकांनाही याचा मिळेल.
– क्रेडिट मर्यादा वाढवण्याचा पर्याय: कार्ड वापरकर्ता जारी मर्यादेचा योग्य वापर करून आणि वेळेवर थकबाकी भरून आपली क्रेडिट मर्यादा वाढवू शकतो. तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनी आपल्या नवीन कार्डावर प्रवेश किंवा वार्षिक शुल्क आकारणार नाही.
– या मागील हेतू काय ? : ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या 20 कोटी भारतीयांपर्यंत पोहोचण्याचा हेतू आहे, परंतु कमी उत्पन्न किंवा कमी सिबिल स्कोअरमुळे ते क्रेडिट कार्ड मालक बनू शकले नाहीत, त्यांना या ऑफरद्वारे, क्रेडिट इतिहास नसलेल्या वापरकर्त्यांना योग्य व चांगले क्रेडिट स्कोअर तयार करण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, असे कंपनीने म्हटले आहे.