मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यासाठीचे अंतर आता ९ महिन्यांवरुन ६ महिन्यांवर आणण्यात आले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. आता कोरोनाचा बूस्टर डोस ९ महिन्यांऐवजी ६ महिन्यांतच घेता येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे.
आरोग्य सचिवांनी पत्रात लिहिले आहे की, नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन (NTAGI) च्या शिफारशीनंतर दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील ९ महिन्यांचे अंतर कमी करून ६ महिने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ वर्षे आणि त्यावरील सर्व लोक आता ६ महिन्यांत बूस्टर डोस घेण्यास सक्षम असतील.
डोसची अंतिम मुदत कमी
केंद्र सरकारने म्हटले आहे की, या शिफारसीनंतर आता १८ ते ५९ वर्षे वयोगटातील सर्व लोक ज्यांना कोरोनाचा दुसरा डोस मिळाल्यानंतर ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाले आहेत, ते कोविड १९ चा बूस्टर डोस घेऊ शकतात.
Omicronचा धोका
कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारातील BA.2.75 या उप-प्रकाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने विलंब न करता बुस्टर डोसचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमिक्रॉनच्या उप-प्रकारामुळे, गेल्या आठवड्यात देशात एक लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा आकडा गेल्या चार महिन्यांतील उच्चांक आहे. २७ जून ते ३ जुलै दरम्यान कोविडची १.११ लाखांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. या कालावधीत किमान १९२ मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी ४४ टक्के मृत्यू केरळमध्ये झाले आहेत.
Covid 19 Vaccination Booster Dose New rule from Government Corona