विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात कोरोनाची दुसरी लाट वाढत असताना आता विषाणूचे नवीन रूप प्रचंड धोकादायक आणि भयानक असल्याचे सिद्ध होत आहेत. एकीकडे देशातील शास्त्रज्ञ कोरानाच्या डबल व्हेरिएंट बी 1617 चा ब्रेक शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे आणखी एक नवीन प्रकार आढळला असून दहापट अधिक संसर्गजन्य आहे. हैदराबाद आणि गाझियाबादच्या संशोधकांच्या पथकाला हा नवीन प्रकार सापडला असून त्याला ‘ एन 440 के ‘ असे नाव देण्यात आले आहे. या नवीन प्रकारामुळे कोरोना संसर्गाने देशाच्या अनेक भागात आणखी जोरदार लाट येणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
देशात करोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना आता दक्षिण भारतात आढळलेल्या करोना विषाणूमुळे चिंतेत भर पडली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत या विषाणूच्या तीव्रतेमुळे चिंतेत वाढ झाली आहे. हा करोना व्हेरियंट आंध्र प्रदेशमध्ये आढळून आला आहे. या विषाणूची तीव्रता १५ पटीने अधिक असल्याचे सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीलतील शास्त्रज्ञांनी सांगितले असून या विषाणूमुळे ३ ते ४ दिवसात रुग्ण बाधित होतो.
त्याचप्रमाणे N44OK हा करोनाचा विषाणू B.1.617 आणि B.1.618 या व्हेरियंटपेक्षा अधिक घातक असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू रुग्णांना लगेच गंभीर संसर्ग करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ३ ते ४ दिवसातच रुग्णाची स्थिती खालावत असल्याने चिंता वाढली आहे. हा व्हायरस तरुणांमध्ये मोठ्या संख्येने पसरत आहे. त्याचबरोबर व्यायाम आणि रोग प्रतिकारशक्ती अधिक असलेल्या लोकांवरही प्रभाव पडत आहे.
विशेष म्हणजे दक्षिण भारतात आढळून आलेला N44OK हा व्हायरस सर्वत्र पसरत आहे. त्याचे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात B.1.1.7 या व्हेरियंटची सर्वाधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र आता समोर आलेला विषाणू सर्वाधिक घातक असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे.
आंध्र प्रदेशातील कुर्नूल शहरात हा प्रकार प्रथम सापडला असल्याचे संशोधकांनी सांगितले. त्याला एपी व्हेरियंट देखील म्हटले जात आहे. आता हा प्रकार आंध्र आणि तेलंगणासह देशाच्या बर्याच भागात वेगाने पसरत आहे.
दुसर्या लाटेदरम्यान आंध्र आणि तेलंगणातील सर्व नवीन प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे या प्रकारामुळे घडली आहेत आणि ती सतत वाढत आहे, असा संशोधकांचा दावा आहे. गेल्या दोन महिन्यांत देशातील निम्म्या पेक्षा जास्त रुग्ण प्रकरणे कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांतून समोर आले आहेत.