India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यात गाजलेल्या दुहेरी खून खटल्यात रवी निकाळजेसह चार जणांना कोर्टाने दिली ही शिक्षा

India Darpan by India Darpan
February 14, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्ववैमनस्य व जुने वादावरून तलवार व कोयत्याने हल्ला करुन दोन जणांचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. पी देसाई यांनी दिला. २७ डिसेंबर २०१७ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास राजीव नगर झोपडपट्टी लगत रवी गौतम निकाळजे, दीपक दत्ता व्हावळ, कृष्णा दादाराम शिंदे, नितीन उत्तम पंडित, आकाश उर्फ बबलू डंबाळे यांनी दिनेश निळकंठ मिराजदार (२२) देविदास वसंत ईघे (२२) यांच्यावर हल्ला केला होता. त्यात या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या चारही हल्लेखोरांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे या आरोपी विरुध्द रिक्षा चालक रमेश भीमराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याची सुनावणी न्यायालयात जुलै २०१८ पासून सुरू होती. सदर खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज बघून एकूण १९ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. या खटल्यात त्तीन साक्षीदारांचा जबाब, मयताच्या शरीरावरील जखमा, शवविच्छेदन अहवाल, रासायनिक विश्लेषणचा अहवाल हे महत्त्वाचे पुरावे ठरले. या सर्व पुराव्यावरुन न्यायालयाने पाचही आरोपींना मृत्यूप्रकरणी जबाबदार धरले.

बेकायदेशीरपणे गैर कायद्याची मंडळी जमवून आरोपींनी सदरचे क्रुर कृत्य भरस्त्यावर केल्याचे सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंड ठोठावला. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी न्यायालयात आरडा ओरडा केला. परंतु न्यायालयात हजर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सदर निकाल ऐकण्यासाठी जिल्हा न्यायालय आवारात नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.

सदर खटल्याच्या सुनावणीकडे व निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. अशा प्रकारे तरुण पिढीच्या हातून अविचाराने घडणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा बसणे आवश्यक आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या इसमावर सदर निकाल एक प्रतिबंधात्मक कारवाई ठरेल असे मत जिल्हा सरकारी होतील अजय मिसर यांनी व्यक्त केले.


Previous Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थोडी खुशी, थोडा गम! सुधारित वेतन मिळणार, पण…

Next Post

पिकअप वाहनाच्या चोरकप्प्यात लपवला मद्यसाठा; पोलिसही झाले अवाक… अखेर असे झाले उघड

Next Post

पिकअप वाहनाच्या चोरकप्प्यात लपवला मद्यसाठा; पोलिसही झाले अवाक... अखेर असे झाले उघड

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group