मंडी (हिमाचल प्रदेश) – येथील आयआयटीच्या स्कूल ऑफ बेसिक सायन्सच्या संशोधकांनी कोविड विषाणूच्या एका प्रमुख प्रोटिन संरचनेच्या एका भागाला शोधून काढले आहे. यामुळे कोरोनाच्या योग्य आणि चांगले उपचार विकसित करण्यास मदत मिळणार आहे. तसेच विषाणूच्या हालचाली, संक्रमण आणि आजाराची गंभीरता समजणे सोपे ठरणार आहे.
या पथकाने त्यांचे निष्कर्ष करंट रिसर्च इन वायरोलॉजिकल सायन्स नावाच्या नियतकालिकेत प्रकाशित केले आहेत. यामध्ये वाराणसी हिंदू विद्यापीठाच्या संशोधकांची मदत घेण्यात आली आहे. मंडी आयआयटीचे सहाय्यक प्रध्यापक डॉ. रजनीश गिरी या शोधपत्राचे सहलेखक आहेत. तसेच अमित कुमार, अंकुर कुमार आणि प्रतीक कुमार यांच्यासह वाराणसी हिंदू विद्यापाठाच्या डॉ. नेहा गर्ग हे सहाय्यक संशोधक आहेत.
आता फक्त लक्षणांवर उपचार
सध्या कोविड विषाणूवर लक्षणांवर उपचार होतो आहे. यादरम्यान शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आजाराशी लढा देत असते. विषाणूची पुन्हा वाढ होणार नाही, अशा अँटिव्हायरल औषध उपलब्ध असण्याबाबत अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. कोणत्याही विषाणूचा परिणाम संपविण्याचा एक पद्धत म्हणजे त्याचे प्रोटिनचा शोध घेऊन त्याला नष्ट करणे होय. विषाणूसंबंधात आजाराला समजणे आणि विषाणूवर परिणामकारक औषध विकसित करण्यासाठी सहाय्यक ठरू शकेल.