India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रस्त्याच्या कडेला लागवड केलेल्या झाडांवर ठेकेदारांनी फिरवला जेसीबी

India Darpan by India Darpan
October 12, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

उरण – रायगड जिल्ह्यातील उरण बोकडवीरा – जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेल्या झाडांवर ठेकेदारांनी जेसीबी फिरविल्याची दुदैवी घटना उरण तालुक्यात मंगळवारी घडली आहे.त्यामुळे प्रवाशी नागरीक व पर्यावरण प्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे. उरण परिसरात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या परिसरात झपाट्याने प्रदुषण ही वाढत आहे. त्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी उरण – पनवेल या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी विविध झाडांचे संवर्धन व जतन करण्याचे काम जुनं ते जुलै २०२२ या महिन्यात हाती घेतले. परंतु, संबंधित ठेकेदारांनी उरण बोकडविरा – जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या साईट पट्टीवरील वाढलेले गवत जेसीबी मशीने काढण्याचे काम हाती घेतले आहे.परंतु सदर कामात गवता बरोबर नूकताच लागवड करण्यात आलेली झाडे ही जेसीबी मशीनच्या खाली आल्याने प्रवाशी नागरीक व पर्यावरण प्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे.

खात्याची परवानगी न घेता लागवड
सध्या उरण करळ – बोकडवीरा रस़्त्यावरील खड्डे भरण्याचे काम व साईट पट्टीवरील वाढलेले गवत काढण्याचे काम ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू आहे.परंतु सदर रस्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेली झाडे ही आमच्या खात्याची परवानगी न घेता लागवड करण्यात आली आहेत. तरी पण जेसीबी मशीनच्या खाली झाडे आलेली आहेत की नाही याची माहिती नाही. माहिती उपलब्ध झाल्यावर आपणांस कळविण्यात येईल.
– नरेश पवार – उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण
>>
वन विभागाला सदर घटनेची माहिती नाही
उरण तालुक्यातील रस़्त्यांच्या कडेला लागवड करण्यात आलेली झाडे ही उरण वन विभागाच्या माध्यमातून लागवड करण्यात आलेली नाही.त्यामुळे वन विभागाला सदर घटनेची माहिती नाही.
– श्री कोकरे वरिष्ठ अधिकारी, वन विभाग उरण
>>
पंचनामे करण्यात येत आहे
उरण तालुक्यातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ठिक ठिकाणी तसेच नागरीकांच्या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. उरण – जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या कडेच्या जागेवरील लागवड करण्यात आलेली झाडे जेसीबी मशीनच्या खाली तूटली आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्याचे पंचनामे करण्यात येत आहे.
– सौ.सावंत मँडम, वरिष्ठ अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग उरण – पनवेल


Previous Post

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक- ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत मनपा आयुक्त इक्बाल म्हणाले…

Next Post

अंधेरी पोटनिवडणूक- ठाकरे गटाकडून नवा उमेदवार उभा करणार?

Next Post

अंधेरी पोटनिवडणूक- ठाकरे गटाकडून नवा उमेदवार उभा करणार?

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group