इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
ग्राहकांसाठी तक्रारीची ऑनलाईन सुविधा
ग्राहक राजा तू विविध कारणाने फसवला गेला असशील तर गप्प बसू नकोस. अन्याय सहन करणे म्हणजेच अन्यायाला पाठिंशी घालण्याचे पाप आहे. आपल्या शेतीच्या बांधावरून/घरातून/कामाच्या ठिकाणावरून ग्राहक आयोगात तक्रार दाखल करा. त्यासाठी तुम्हाला कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे आपण आता सविस्तर जाणून घेऊ…

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
(अखिल भारतीय ग्राहक पंचायत) मो. 9422502315
शेतकरी ग्राहक, सामान्य ग्राहक हा खालील वेळी उत्पिडीत होऊ शकतो, फसू शकतो, सेवा मिळू शकत नाही.
१) बी बियाणे, खते, शेती उपयोगी साहित्य खरेदी जसे ट्रॅक्टर खरेदी, औजर खरेदी इत्यादी
२) विविध सेवा खरेदी ज्यात पीक विमा, अपघात विमा, बँकेतील विविध सर्व्हिसेस इत्यादी
३)कापडलत्ता खरेदी, सोने नाणे, भांडी, घरातील साहित्य खरेदी इत्यादी
४) मुलांचे लग्न आणि विविध कार्यक्रम साठी घेतलेल्या विविध सेवा त्यात वाजंत्री, कार्यालय, जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट, सजावटीचे कॉन्ट्रॅक्ट इत्यादी.
५) डॉक्टर कडे / हॉस्पिटल मध्ये जाऊन घेतलेले उपचार, टेस्टिंग, सल्ले इत्यादी
६) आपल्या जनावरांसाठी घेतलेले उपचार, औषधे, लसी इत्यादी सर्व सेवा
७) आपल्या मुलांसाठी घेतलेल्या शैक्षणिक सेवा, पुस्तके, वह्या आणि शालेय साहित्य खरेदी इत्यादी
८)रेल्वे, विमान, बस प्रवास सेवा इत्यादी
९) विविध टूर पॅकेज सेवा (देशांतर्गत आणि विदेशात)
१०) विविध ऑनलाईन खरेदी आणि विविध सेवा त्यात घरी येऊन देणारी सेवा ऑनलाईन घेतली असेल तर तीही.
११) घर/फ्लॅट, प्लॉट, गाडी खरेदी करताना
१२) हॉटेल/लॉज बुकिंग सेवा घेताना.
जेव्हा आपल्याला वाटते की आपणास वस्तूचा दर्जा खराब दिला आहे, आपणास फसवले गेले आहे, आपणास कबूल केल्या प्रमाणे सेवा दिली गेली नाही, सेवेत त्रुटी आहेत, लेखी किंवा तोंडी करारनाम्यात नमूद केल्या प्रमाणे सेवा सुविधा दिल्या गेल्या नाहीत तेव्हा ग्राहक राजा तू हतबल होऊन गप्प बसू नकोस, तू तक्रार करू शकतो तेही आपल्या रोजच्या कामाच्या ठिकाणावरूनच म्हणजे शेतकरी आपल्या बांधावरून, कष्टकरी कामगार आपल्या कामाच्या ठिकाणावरून, व्यापारी आपल्या दुकानात बसून(व्यापारी एक सेवा/वस्तू विक्रेता आहे पण इतरत्र तोही ग्राहक आहे), उद्योगपती, व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या ठिकाणाहून ग्राहक आयोगात थेट तक्रार दाखल करू शकतो.
ग्राहक कायदा २०१९ नुसार केंद्र सरकारने ई दाखील सेवा सुरू केली आहे. त्यामुळे त्याचा लाभ घ्या. आयोगात जायची गरज नाही. तक्रार दाखल देखील ऑनलाईन करू शकतो, व्हिडिओ कॉन्फरन्स ने आपल्या जागेवर, घरात बसून आपले मुद्दे पटवून देऊ शकतोस.
आता त्या साठी काय करायचे ते पहा.
आपली वस्तू, सेवा यांची खरेदी किंमत किती आहे त्यावर कोणत्या आयोगात जायचे ते ठरते.
ग्राहक आयोगाचे तीन प्रकार आहेत.
१) *जिल्हा आयोग*…यात आपण खरेदी किंमत/सेवा मूल्य हे ५० लाख पर्यंत असेल तर तक्रार दाखल करू शकतो.
२) *राज्य आयोग*.. यात आपण खरेदी किंमत/सेवा मूल्य हे ५० लाख ते २ कोटी पर्यंत असेल तर तक्रार दाखल करू शकतो.
३) *राष्ट्रीय आयोग*.. यात आपण खरेदी किंमत/सेवा मूल्य हे २ कोटीचे वर असेल तर तक्रार दाखल करू शकतो.
तेव्हा आपण कोणत्या आयोगात जायचे हे आपणच ठरवा.
यात आपण सामुदायिक रित्या देखील तक्रार दाखल करू शकतो. जेव्हा सामुदायिक तक्रार दाखल करतो तेव्हा सर्व तक्रार दार यांचे सर्वांचे मिळून जे मूल्य होते त्या प्रमाणे आपण आयोग निवडू शकतो.
उदाहरणार्थ आपण एकत्रित रित्या बी बियाणे घेतले आहे त्यात फसलो आहोत, एकत्रित रित्या फ्लॅट घेतले आहेत त्यात फसलो आहोत तर सर्व लोकांना एकत्र करून पण आपण तक्रार दाखल करू शकतो.*
योग्य त्या ग्राहक आयोगात तक्रार दाखल करणे साठी ई दाखिल द्वारे आपण केस दाखल करू शकता त्याची लिंक खालील प्रमाणे आहे.
https://edaakhil.nic.in
आता आपण केस इ-दाखील कशी करायची ते पाहू.
सर्व प्रथम ब्राऊझर (गूगल क्रोम किंवा इतर) मध्ये जाऊन www.eDaakhil.nic.in असे टाईप करा.
आपले रजिस्ट्रेशन करून घ्या. (User ragistration) त्यानंतर तक्रार दाखल करणे साठी सुरुवात करा. आपण आपल्याजवळ जे पुरावे आहेत जसे बिल, करारनामा, लिहिलेली पत्रे, विरोधी पार्टीने दिलेली उत्तरे, इतर पुरावे जे आपणास योग्य वाटत आहेत ते. यांची स्कॅन करून pdf प्रत तयार ठेवा. लक्षात ठेवा PDF file ही जास्तीत जास्त लहान ठेवा. (आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मधून Adobe स्कॅन डाउनलोड करून मोबाईल ने स्कॅनिंग करू शकता आणि pdf file तयार करू शकता)
– आपले युवजर नेम आणि पासवर्ड रजिस्ट्रेशन करताना काय देत आहात ते लक्षात ठेवा.
– रजिस्ट्रेशन करताना आपले ओळख पत्र (pan card, voter ID, आधार कार्ड इत्यादीची सॉफ्ट कॉपी (pdf) करून तयार ठेवा)
आपला ईमेल आयडी आणि फोन नंबर ने आपण efile करू शकता.
– एकदा आपण इमेल आयडी आणि मोबाईल नंबर पोर्टल वर रजिस्टर केला की आपण लॉगिन करू शकता.
– रजिस्ट्रेशन करताना आपले पूर्ण नाव, ईमेल आयडी, फोन नंबर, पूर्ण पत्ता, पिन कोड सह द्यावा लागतो.
– पत्याचा पुरावा म्हणून एक pdf फॉरमॅट मध्ये डॉक्युमेंट अपलोड करावे लागते( वोटर आयडी, पासपोर्ट, लायसेन्स, लाईट बिल इत्यादी पैकी एक पुरावा तयार ठेवायचा असतो)
– आपले अकाऊंट ॲक्टिवेट करायचे असते. ते आपण मोबाईल वर आलेल्या otp ने आणि ईमेल मधील लिंकनी करू शकता.
– आपण रजिस्ट्रेशन करताना complainant Advocate या लिंक मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागते.
– एकदा लॉगिन झाले की आपण नवीन केस रजिस्ट्रेशन करू शकता. आपण याच पोर्टल मधे आपल्याला रीजोईडर(विरोधी पार्टीने सबमिट केलेले उत्तरावर आपले म्हणणे) फाईल करायचे असेल तर ते ही करू शकता.
– तक्रार दाखल करताना आधी एक इंडेक्स तयार करून घ्यायची असते. इंडेक्स मध्ये आपण आपली तक्रार,जोडणारे पुरावे, पत्रे, उत्तरे, पावत्या यांचा समावेश असतो)
– तसेच लिस्ट ऑफ dates म्हणजे आपल्या घडलेल्या घटना ची यादी तारखे प्रमाणे (जसे करारनामा या दिवशी केला, मला या दिवशी ताबा देणार होते, मी या दिवशी इतके पैसे दिले, पत्र या दिवशी पाठवले इत्यादी)
– तसेच मेमो ऑफ पार्टी म्हणजे तक्रार दाराचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर तसेच सर्व विरोधी पक्षाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी माहिती.
– तक्रार ची प्रत (आपली संपूर्ण तक्रार त्यात खरेदी पासून आज पर्यंत आपण दिलेले पैसे, पावती, पाठवलेली पत्रे, आलेली उत्तरे इत्यादी माहिती) तयार करून त्याची pdf फाईल करून ठेवायची.
– जर तक्रार ५ लाख पेक्षा कमी असेल तर काहीही फी नाही. पाच लाख पेक्षा जास्त खरेदी/सेवा विकत ची रक्कम असेल डिमांड ड्राफ्ट ने किंवा ऑनलाईन रक्कम भरू शकता. त्याची माहिती आपणास याच पोर्टल वर मिळेल.
– आपण कॉज ऑफ एक्शन मध्ये आपले राज्य, जिल्हा यांची माहिती द्यावयाची आहे.
– आपण माहिती भरत असताना आपल्याला एका पेक्षा जास्त तक्रार दार, तसेच एका पेक्षा जास्त विरोधी पार्टी यांची माहिती भरता येते. त्यासाठी आपणास additional complaint, additional opposite party यावर जाऊन माहिती भरायची असते.
– त्यानंतर आपल्याकडे वर सांगितल्या प्रमाणे pdf format मधील माहिती अपलोड करायची असते.
– आपण सर्व माहिती भरल्या नंतर सबमिट करताना सर्व आपली डॉक्युमेंट एकत्र दिसतील आणि त्यानंतर कोणत्या आयोगात आपणास केस दाखल करायची आहे तिथे आपण सिलेक्ट करून केस दाखल करू शकता.
– फी ऑनलाईन भरल्या नंतर आपल्याला एक OTP येईल आणि त्यानंतर केस सबमिट होईल आणि आपणास माहिती मिळेल.
– फी किती भरायची याची माहिती पण आपणास केस दाखल करताना मिळेल. त्याप्रमाणे आपण डिमांड ड्राफ्ट, पोस्टल ऑर्डर तसेच ऑनलाईन मोड मध्ये फी देता येते.
– एकदम सोपी पद्धत तयार केली आहे.
– आपण खालील address type केल्यावर साईट मध्ये गेल्यावर आपणास एक edaakhil हँडबुक देखील उपलब्ध आहे.
– शिवाय आपणास सबमिट बटण दाबले की पुढे वेगवेगळे व्हिडिओ तयार केले आहेत.
– त्यात केस कशी फाईल करायची, फी कशी भरायची, रेजॉईडर कसे दाखल करायचे, उत्तर कसे द्यायचे याचे वेगवेगळे व्हिडिओ तयार केले आहेत ते पहा आणि आपल्यावर झालेला अन्याय दूर करा.
– तसेच केस फॉरमॅट पण दिले आहेत. याच पोर्टल वर https://edaakhil.nic.in
तेव्हा ग्राहक राजा जागा हो. सरकार ने सुरू केलेल्या eDaakhil चा फायदा घे. आपल्यावर झालेला अन्याया विरुध्द्ध दाद माग.
या सर्व गोष्टींसाठी आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे आपल्या जिल्ह्यातील लोकांचे मार्गदर्शन घेऊ शकता. *अगदी मोफत*
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत* सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971
*देवगिरी परभणी* श्री विलास मोरे 09881587087
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक* श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार* श्रीम.वदंना तोरवणे, मो .9156972786
Consumer Online Complaint Facility by Vijay Sagar
Customer Cheating