India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘मी जिंकेन किंवा हरेन!’ वकील कपिल सिब्बल घटनापीठाला असे का म्हणाले?

India Darpan by India Darpan
February 23, 2023
in Uncategorized
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल असे काही बोलले की त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं आहे. घटनापीठापुढे सिब्बल यांनी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला आणि दिवस संपता संपता त्यांनी केलेलं विधान वाऱ्यासारखं संपूर्ण देशात पसरलं.

‘मी ही केस जिंकेन किंवा हरेन..त्यासाठी मी इथे उभा नाही. मी इथे उभा आहे घटनात्मक नैतिकता टिकून राहावी यासाठी, जी आपण 1950 पासून रुजवत आलो आहोत देशात.. यासाठी मी उभा आहे…’ असा युक्तिवाद करून सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. राज्यपालांनी घटनात्मक नैतिकता पाळली पाहिजे असे आपण म्हणतो, पण इथे नैतिकता कुठेच दिसत नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख असताना राज्यपालांनी शिंदे यांना कोणत्या पदावर उपस्थित राहून मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.

शिंदे गटाने आणि भाजपने राज्यपालांशी संपर्क साधल्यानंतर राज्यपालांनी सेनेला सिश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितला. त्यांच्या ३९ आमदारांना गट म्हणून मान्यता दिली. तरीही बहूमत सिद्ध करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनाच देण्यात आले. एवढी तथ्य स्पष्ट असताना आणखी काही अर्थ लावण्याची गरज नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. सरकार पडणार नाही याची खात्री करण्याचा मार्ग म्हणजे विश्वासदर्शक ठराव मांडणे होय. पण त्यांचे (शिंदे गट) आधीच ठरले होते. त्यामुळे ते गुजरात आणि आसामला गेले. राज्यपालांनी खरं तर तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, असा सवाल करायला हवा होता, असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

तर नोटिशी रद्द कराव्या
आसाममधून प्रतोद निवडण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही, ही बाब न्यायालयाला मान्य असेल तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयही रद्द करण्यात यावा. ठाकरे गटाच्या आमदारांना बजावण्यात आलेल्या नोटिशी न्यायालयाने अमान्य कराव्या, अशी मागणी सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.

भावनिक विधान
सिब्बल यांनी अडिच तास पोटतिडकीने युक्तिवाद करताना शेवटच्या क्षणाला भावनिक विधान केले. आपण केस जिंकलो किंवा हरलो तरीही फरक पडत नाही. पण घटनात्मक नैतिकता टिकून राहण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे सिब्बल म्हणाले.

Advocate Kapil Sibbal on Supreme Court Statement


Previous Post

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयात आज काय झालं? सरन्यायाधीश काय म्हणाले?

Next Post

ग्राहकांनो, तुमची फसवणूक झाली आहे? येथे मागू शकता दाद, आता घरबसल्या येथे करा तक्रार

Next Post

ग्राहकांनो, तुमची फसवणूक झाली आहे? येथे मागू शकता दाद, आता घरबसल्या येथे करा तक्रार

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group