नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए)च्या अध्यक्ष आणि माजी कॉंग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीला संसर्ग झाला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
रुग्णालयाने आरोग्य बुलेटिन जारी करुन सांगितले आहे की, छातीच्या औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुप बसू आणि त्यांच्या टीमद्वारे सोनिया गांधींवर उपचार केले जात आहेत. २ मार्च रोजी तापाच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पूर्व कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी जी के अस्वस्थ होने का समाचार प्राप्त हुआ।
ईश्वर से प्रार्थना है कि उन्हें जल्द स्वास्थ्य लाभ प्राप्त हो।#SoniaGandhi @INCIndia @kharge @kcvenugopalmp pic.twitter.com/5RwgMhXrFu
— Ramkishan Ojha (@RamkishanO) March 3, 2023
Congress Ex President Sonia Gandhi Admitted in Hospital