शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कर्मचाऱ्यांना बोनस दिला आणि परतही मागितला! या कंपनीच्या कारभाराची सर्वत्र जोरदार चर्चा

by India Darpan
सप्टेंबर 24, 2022 | 1:46 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची शाबासकी देण्यासाठी तसेच सण किंवा काही विशेष कारणानी कंपन्या बोनस देत असतात. बोनस मिळाल्याचा आनंद पगार झाल्याच्या आनंदापेक्षाही मोठा असतो. त्यामुळे कर्मचारी खूश असतो. होंडा मोटर या जगप्रसिद्ध कंपनीनेदेखील कर्मचाऱ्यांना असाच बोनस दिला. पण आश्चर्य म्हणजे बोनस देऊन तो परतही मागितला आहे.

कर्मचाऱ्यांना बोनस दिला तर कर्मचारी आणखी जोमाने काम करू लागतो. परंतू, होंडा या जगप्रसिद्ध जपानी कंपनीने आधी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी बोनस वाटला, आता परत मागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. होंडा मोटर ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना जास्त बोनस दिल्याचे कारण सांगून तो परत मागत आहे. होंडा कार कंपनीने मॅरिसविले, ओहियोच्या प्लांटमधील कर्मचाऱ्यांना थेट मेमोच पाठविला आहे. यामध्ये कंपनीने तुम्हाला बोनस रकमेपेक्षा जास्तीचा बोनस दिला आहे. तो कंपनीला परत करावा असे म्हटले आहे. यामुळे आनंदी असलेले कर्मचारी कंपनीच्या या कृत्यावर प्रचंड नाराज आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जर कर्मचाऱ्यांनी या मेमोला प्रतिसाद दिला नाही, तर त्यांच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार असल्याचे मेमोमध्ये म्हटले आहे.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांकडे कायदेशीररित्या बोनसची रक्कम परत मागितल्याचे म्हटले आहे. परंतू, कर्मचाऱ्यांना किती बोनस दिला गेला आणि किती परत मागितला यावर कंपनीने भाष्य केलेले नाही. “या महिन्याच्या सुरुवातीला, होंडाने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला होता, त्यापैकी काहींना जास्त पैसे दिले गेले होते. नुकसानभरपाईशी संबंधित समस्या ही संवेदनशील बाब आहे आणि आम्ही आमच्या भागीदारांवर होणारा कोणताही संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने होंडाने बोनसच्या रकमेपैकी १० टक्के रक्कम परत मागितल्याचा दावा केला आहे. परत करावयाची रक्कम खूप जास्त आहे, असे ती म्हणाली. दरम्यान, जगभर होंडा मोटर कंपनीच्या या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

Company Given Bonus and Now Taking Return from Employee
Automobile
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विशेष लेखः- वज्रलेप / मूर्तीसंवर्धन योग्य आहे का? प्राचीन काळी काय पद्धत होती? घ्या जाणून सविस्तर…

Next Post

पुण्यात शालेय मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; पालकांमध्ये चिंता

Next Post
crime 6

पुण्यात शालेय मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; पालकांमध्ये चिंता

ताज्या बातम्या

World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011