मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने बहुतांश नागरिक सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास घाबरतात, त्यामुळे प्रत्येकालाच आपले स्वतःचे दुचाकी वाहन असावे, असे वाटते. त्यामुळे दुचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अनेक वाहन कंपन्यां नवनवीन दुचाकी बाजारात आणण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. होंडा अॅक्टिव्हा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. डिसेंबर 2021 मध्ये, त्याच्या स्कूटर सेगमेंटमध्ये सर्वाधिक 104,417 युनिट्सची विक्री झाली. तथापि, 2020 च्या तुलनेत त्याच्या विक्रीत काहीशी घट झाली आहे. आता याच्याशी स्पर्धा करण्यासाठी, यामाहा मोटर इंडिया (Yamaha Motor India ) लवकरच त्यांची 125cc स्कूटर – Fascino आणि Ray ZR अपडेट करून बाजारात आणणार आहेत. या दोन्ही स्कूटर आधीच बाजारात आहेत पण कंपनी त्यांना अपडेट करून पुन्हा लॉन्च करू शकते.
एका अहवालानुसार, 2022 चे यामाहाचे नवे मॉडेल पुढील काही महिन्यांत येणार आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. Fascino आणि Ray ZR नवीन रंग पर्यायांसह अपडेट केले जाऊन बाजारात आणले जाऊ शकतात. या स्कूटर वेगवेगळ्या सीट आणि कलर व्हीलसह ऑफर केल्या जाऊ शकतात, त्यामुळे त्याच्या किंमतीत देखील वाढ होईल. तथापि, त्याचे कार्य, हार्डवेअर आणि वैशिष्ट्य सूचीमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाहीत. होंडा अॅक्टिव्हा आणि यामाहा या वाहनांची वैशिष्ट्ये पाहू या…
होंडा अॅक्टिव्हा 6G
होंडा अॅक्टिव्हा 6G मध्ये 109.51 cc इंजिन आहे, जे 7.79 PS पॉवर आणि 8.79 Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही स्कूटर ड्रम बॅक ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. मायलेजबद्दल कंपनीच्या दाव्यानुसार, हे वाहन एका लिटरमध्ये 55 किलोमीटरपर्यंत चालवू शकता. दुसरीकडे, 2 ) होंडा अॅक्टिव्हा 125 : Honda Activa 125 मध्ये 124 cc इंजिन आहे, जे 8.29 PS पर्यंत पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही स्कूटर डिस्क ब्रेकसह येते. तसेच कंपनीचा दावा आहे की त्याचे मायलेज 60 kmpl पर्यंत आहे. आता Honda Activa 125 Drum व्हेरिएंटची भारतात किंमत 73,203 रुपये आहे. तर Honda Activa 125 Drum Alloy व्हेरिएंटची किंमत 76,771 रुपये आहे. Honda Activa 125 डिस्क व्हेरिएंटची किंमत 80,325 रुपये आहे.
यामाहा फसिनो 125
सध्याचे Yamaha Fascino 125 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. मायलेजबाबत, यामाहा दावा करते की ही Fascino 125 ही 68.75 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. Yamaha Fascino 125 ची सुरुवातीची किंमत 72,500 रुपये आहे,
यामाहा रे ZR 125
Yamaha Ray ZR 125 ही स्पोर्टी दिसणारी स्कूटर आहे. यात 113 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7.1 PS कमाल पॉवर आणि 8.1 Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि या स्कूटरचे ट्रान्समिशन स्वयंचलित आहे. या कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 66 kmpl चा मायलेज देते.