शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी – लोकप्रतिनिधींच्या इच्छेतून साकारले १०४ फुटी बजरंगबली!

by Gautam Sancheti
ऑगस्ट 7, 2022 | 9:38 pm
in इतर
0
5 hanuman statue 5 1

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी
लोकप्रतिनिधींच्या इच्छेतून साकारले १०४ फुटी बजरंगबली!

शक्तीची देवता असलेल्या हनुमानाच्या जगातल्या सर्वांत उंच मुर्तींचा परिचय करून घेतांना अनेक मजेशीर आणि मनोरंजक योगायोग ऐकायला मिळतात. महाराष्ट्रातील नांदुरा येथे इथल्या कांद्यांमुळे हनुमान येथे आल्याचा किस्सा मागच्या लेखांत सांगितला. आज आपण उत्तर प्रदेशांतील शाहजहाँपूर येथील हनुमतधाम येथील १०४ फूट उंच हनुमानाची माहिती जाणून घेणार आहोत.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

या हनुमान मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे सात वेळा शाहजहाँपूर विधानसभेत निवडून जाणार्या सुरेश कुमार खन्ना या लोकप्रतिनिधींनी आपले श्रद्धास्थान असलेल्या हनुमानाची जगातली सर्वांत उंच मूर्ती आपल्या गावांत स्थापन करून आपल्या लाडक्या देवाला अभिवादन केले आहे. पहिल्यावेळी जेंव्हा ते आमदार म्हणून निवडून आले त्याच वेळी त्यांनी हनुमत धाम येथे काहीतरी भव्यदिव्य करण्याचा संकल्प मनाशी केला होता.

हनुमत धाम ची पायाभरणी कशी झाली
इ.स. २००२ ची गोष्ट आहे. सुरेश कुमार खन्ना त्यावेळी दुसर्यावेळी आमदार झालेले होते. त्यावेळी यूपी मध्ये बसपा आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार अधिकारावर होते. शाहजहाँपूरचे आमदार सुरेश कुमार खन्ना त्यावेळी सरकार मध्ये पर्यटन मंत्री होते. शाहजहाँपूर येथील खन्नोत नदीच्या मध्यभागी असलेल्या बिसरत घाटावरील वैशिष्ट्येपूर्ण ठिकाणाला धार्मिक कम पिकनिक स्पॉट बनविण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात घोळत होती. त्यावर अभ्यास करून एक परफेक्ट प्रोजेक्ट त्यांनी सरकार पुढे सादर केला. या ठिकाणी हनुमत धाम या धार्मिक स्थलाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने देखील काही कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाला मंजूरी दिली आणि ४ मे २००३ रोजी उत्तर प्रदेशचे आवास एवं नगरविकास मंत्री लालजी टंडन यांनी या प्रकल्पाचा शुभारंभ केला.

हनुमत धाम येथे जगातील सर्वांत उंच आकर्षक हनुमान मूर्ती प्रमाणेच इतर देव देवतांचा आकर्षक मूर्ती व मंदिरं स्थापन करण्यात आली आहेत. ज्या पर्वतावर हनुमानजीची ही मूर्ती उभी केली आहे त्याच्या खाली एक भव्य नैसर्गिक गुहा असून तिचे अत्याधुनिक स्थानात रूपांतर करण्यात आले आहे. या गुफे मध्ये भाविकांना पूजा अर्चा करण्यासाठी दुसरी हनुमान मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय या गुहेत श्रीगणेश, श्री सूर्यनारायण, शिवलिंग, सरस्वती देवी आणि दुर्गा देवी यांच्या अतिशय देखण्या मूर्ती स्थापित करण्यात आलेल्या आहेत.

सर्वांत उंच हनुमानजी
हनुमत धाम येथील हनुमान मूर्ती १०४ फूट उंच आहे. दिल्लीचे सुप्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनीअर पंकज गुप्ता यांनी हनुमत धामचे स्ट्रक्चरल डिझाईन तयार केले आहे. येथील मुर्तीची उंची प्रथम १०१ फूट उंच ठेवण्याची योजना होती. परंतु २१ फूट उंच चबुतर्यावर १०४ फूट उंचीच्या ह्नुमानाची स्थापना केल्या मुळे मुर्तीची उंची १२५ फूट झाली आहे. अर्थांत प्रत्येक ठिकाणचे स्थानिक लोक आपल्या गावातील मुर्तींची उंची चार पाच फुटांनी वाढवूनच सांगतात. जेथे हनुमान मूर्ती उभारण्यात आली आहे त्याच्या चारी बाजूंना सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मूर्ती समोर आकर्षक कारंजे आणि रंगीबेरंगी लायटिंग करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी तर या ह्नुमानाचे सौंदर्य अनेक पटींनी खुलून दिसते.

नदीच्या मधला संपूर्ण परिसर मखमली हिरवळ आणि विविध प्रकारची औषधी व शोभीवंत झाडं झुडुप लावून सुशोभित करण्यात आला आहे. योग्य प्रकारे विकसित करण्यात आलेले गार्डन येथील प्रमुख आकर्षण आहे.जगप्रसिद्ध हनुमान मूर्ती आणि त्याच्या खालील देखणी गुफा यांचे पर्यंत जाण्यासाठी खन्नौत नदीवर एक पुल देखील तयार करण्यात आला आहे. हनुमत धामचा विकास करण्यासाठी दहा वर्षे आणि दोन महिने कालावधी लागला. ४ मे २००३ रोजी या प्रकल्पाची पायाभरणी झाली आणि ४ जुलाई २०१३ रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

हनुमत धाम येथील सुप्रसिद्ध १०४ फूट उंच हनुमान मूर्ती कुशल मूर्तिकार वीरेंद्र खुदानिया यांच्या मार्गदर्शनाखाली ११ राजस्थानी शिल्पकारांनी दोन वर्षे रात्रंदिवस मेहनत करून तयार केली. ही मूर्ती तयार करण्यासाठी दिड कोटी रूपये खर्च आला. शाहजहाँपूर येथील विशाल बजरंगबली भक्तांचे सर्व कष्ट दूर करतो अशी मान्यता आहे. आसपासच्या जिल्ह्यांतील लोक येथे हनुमानाच्या दर्शानासाठी येतात. यूपी सरकारच्या पर्यटन खात्याच्या मानचिन्हात या हनुमान मुर्तिचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटक देखील येथे मोठ्या संख्येने येतात. रामनवमी, हनुमान जन्मोत्सव यावेळी तर येथे लाखो भाविक एकत्र येतात. हा संपूर्ण परिसर लोकांच्या गर्दीने आणि हनुमत धामच्या सौंदर्याने खुलून जातो.

शाहजहाँपूरचे सात वेळा प्रतिनिधित्व करणार्या सुरेश कुमार खन्ना यांनी यापूर्वी शाहजहाँपूरमध्ये अतिशय सुंदर व देखने शहीद उद्यान, राज्याला अभिमान वाटावी अशी स्वामी विवेकानंद पब्लिक लायब्ररी आणि आता बिसरात घाटावर पवन पुत्र हनुमानाची जगातली सर्वांत उंच मूर्ती स्थापन करून आपले शहर योग्य लोकप्रतिनिधीच्या हातात सुरक्षित असल्याची खात्री शाहजहाँपूरच्या नागरिकांना करून दिली आहे.

Column Rauli Mandiri 104 Feet Hanuman by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी, चांदवड तालुक्यात ढगफूटी सदृष्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान (व्हिडीओ )

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पती, पत्नी रेल्वे स्टेशनवर उभे असतात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - पती, पत्नी रेल्वे स्टेशनवर उभे असतात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011