India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वाहतूक दंड कधीपर्यंत भरायचा?… नियमानुसार किती मुदत असते?… अन्यथा काय होते?… घ्या जाणून सविस्तर..

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in विशेष लेख
0

इंडिया दर्पण विशेष लेखामाला
जागो ग्राहक जागो
वाहतूक दंडाचा कालावधी

विविध कारणांसाठी वाहनांवर दंड आकारला जातो. आपणास वाहतूक पोलीस रस्त्यात, टोल नाक्यावर, शहरात गाडी अडवून आपल्या गाडीवर मागील दंड आहे तो भरा असे सांगतात. लॉ ऑफ लीमिटेशन नुसार आपणास अकारलेला दंडाचा वसूल करणेचा कालावधी किती समजून घेणे आवश्यक आहे.

विजय सागर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
(अखिल भारतीय ग्राहक पंचायत) मो. 9422502315

लोकन्यायालयाची, मोटार वाहन न्यायालयाची नोटीस आपल्याला दंड भरणे साठी येते तेव्हा मागील किती दिवसाचा दंड भरायचा हे आपणास आपल्या भारतातील कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे आपण दंड भरून मोकळे होतो.
ग्राहकराजा २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत असतो. उद्या २४ डिसेंबर २०२२ हा राष्ट्रीय ग्राहक दिन आहे. आपण २६ नोव्हेंबरला संविधान दिन पण उत्साहात साजरा केला. ठराविक राजकीय पक्षांनी त्याबाबत कार्यक्रम घेतले परंतु आपण स्वतः संविधान वाचत नाही, कायदे समजून घेत नाही त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्यावर अन्याय होतो तरी आपल्याला कळतच नाही की आपल्यावर अन्याय झाला आहे.

आज आपण रोजच्या वापरातील आपल्या फायद्याचा एक कायदा *लॉ ऑफ लिमिटेशन* याबाबत थोडे समजून घेऊयात. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 यातील कलम 267 यात *”मर्यादेचा कालावधी” (law of limitations)* याबाबत व्याख्या दिली आहे, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 कलम 468 मध्ये गुन्ह्याची दखल घेण्यासाठी निर्दिष्ट केलेला कालावधी हा खालील प्रमाणे आहे: या संहितेत इतरत्र प्रदान केल्याशिवाय, मर्यादा कालावधी संपल्यानंतर, उप-कलम (2) मध्ये निर्दिष्ट केलेल्या श्रेणीतील गुन्ह्याची दखल कोणतेही न्यायालय घेणार नाही असे नमूद केले आहे

मर्यादेचा कालावधी खालील प्रमाणे असेल-
(अ) *मर्यादा कालावधी सहा महिने, जर गुन्हा केवळ दंडासह शिक्षापात्र असेल;*
(ब) *मर्यादा कालावधी एक वर्ष, जर गुन्ह्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा होत असेल;*
(क) *मर्यादा कालावधी तीन वर्षे, जर गुन्ह्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कारावासाची शिक्षा असेल परंतु तीन वर्षांपेक्षा जास्त नसेल तर.*
या कलमाच्या हेतूंसाठी, एकत्रितपणे खटला चालवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांशी संबंधित मर्यादेचा कालावधी, त्या त्या गुन्ह्याच्या संदर्भात निर्धारित केला जाईल जो अधिक कठोर शिक्षेसह किंवा, परिस्थितीनुसार, सर्वात कठोर शिक्षा आहे तो गृहीत धरला जाईल.
(1) गुन्हेगाराच्या संबंधात, मर्यादेचा कालावधी हा खालील प्रमाणे सुरू होईल:
(अ) गुन्ह्याच्या तारखेपासून;
किंवा
(ब) गुन्ह्यामुळे दुखी झालेल्या व्यक्तीला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला गुन्हा घडल्याची माहिती नसताना, ज्या दिवशी असा गुन्हा अशा व्यक्तीच्या किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीत येईल त्या दिवशी, यापैकी जे आधी असेल;
किंवा
(c) गुन्हा कोणाकडून झाला हे माहीत नसताना, ज्या दिवशी गुन्ह्यामुळे दुखावलेल्या व्यक्तीला किंवा गुन्ह्याचा तपास करणार्‍या पोलिस अधिकाऱ्याला, यापैकी जे आधी असेल त्या दिवशी गुन्हेगाराची ओळख कळते तेव्हा पासून.

या प्रमाणे पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी, कोणतेही न्यायालय मर्यादेची मुदत संपल्यानंतर गुन्ह्याची दखल घेऊ शकते, जर ते वस्तुस्थितीवर आणि प्रकरणाच्या परिस्थितीत विलंब योग्यरित्या स्पष्ट केले गेले असेल किंवा न्यायाच्या हितासाठी तसे करणे आवश्यक आहे अशा वेळी त्याची दखल घेतली जाऊ शकते.
सदर मर्यादेचा कालावधी(law of limitations) संपल्यानंतर याबाबत दखल घेण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. याचाच अर्थ असा की ६ महिने पेक्षा जास्त जुना दंड हा वसूल करता येत नाही जर सदर गुन्ह्यासाठी फक्त दंड असेल आणि कोणतीही शिक्षा नसेल तर.*
तेव्हा ग्राहक मित्रानो जरा कायदा समजून घ्या त्याचा फायदा घ्या!
गुगल प्ले स्टोअर मधून mahatraficapp ॲप डाऊन लोड करा, त्यात जाऊन आपणावर कोणता जुना दंड आहे ते स्वतः तपासून पहा.
एखाद्या कायद्याच्या जाणकार वकिलास विचारून घ्या आणि पोलिसांनी आपणास जुना दंड आहे म्हणून थांबवले तर त्यांना कायदा समजावून सांगा, लोकन्यायालयाची नोटीस आली तर कायदा समजून घ्या आणि आपली सुटका करून घ्या. तेव्हा कायद्याचा फायदा आपणास नक्की होईल.

ग्राहक कायद्याबाबत आपणास मोफत मार्गदर्शन साठी आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी संपर्क करून ग्राहक कायदा समजून घ्या आणि त्याचा फायदा करून घ्या. चला तर ग्राहक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188

श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286, श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
*मध्य महाराष्ट्र प्रांत* श्री बाळासाहेब आवटी 9890585384
*नागपूर*: श्री विलास ठोसर 7757009977
*औरंगाबाद/देवगिरी प्रांत* : डॉक्टर विलास मोरे 8180052500
*कोकण प्रांत:* श्री विजय भागवत 9404156329

Column Jago Grahak Jago Traffic Fine by Vijay Sagar
Consumer Rule


Previous Post

अभिमानास्पद! या दोन मराठी पुस्तकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर; पुणे व कोकणातील साहित्यिकांचा सन्मान

Next Post

कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले हे निर्देश

Next Post

कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group