इंडिया दर्पण विशेष लेखमाला
बुलेटवरील भारत भ्रमंतीचा थरार भाग ३
अटारी वाघा बॉर्डरवरील अनपेक्षित आणि अदभुत अनुभव
गेल्या काही भागापासून आपण बाईक राईडचा विलक्षण अनुभव जाणून घेत आहोत. आज आपण एक अद्भुत आणि विलक्षण अनुभव प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत. तो आहे अटारी वाघा बॉर्डरचा….

इंदिरानगर, नाशिक
मो. 7972479858
जालंदरहून लंच करून निघाल्यानंतर अमृतसरला पोहोचण्याच्या आधी आम्हा सर्वांना अटारी वाघा बॉर्डरची व्हिजिट करायचे होते. साधारण संध्याकाळी चार वाजता आम्ही अटारी वाघा बॉर्डर वर पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर बघतो तर काय? भारतीय जवानांनी आमच्या स्वागतासाठी अतिशय उत्साहात मोठमोठे बॅनर लावले होते. आणि त्या जवानांनी फुलांच्या माळा आम्हा प्रत्येक फ्रीडम मोटो रायडरच्या गळ्यात घालून अगदी जल्लोषात आमचे स्वागत केले. त्यावेळी कुठल्याही इंटरनॅशनल बॉर्डरला भेट देण्याची माझ्या आयुष्यातली आणि माझ्यासारख्या इतर रायडर्सच्या आयुष्यातली ती प्रथमच वेळ होती. एवढा मान सन्मान एवढी आपुलकी डोळे पाणवले होते.
दररोज अटारी वाघा बॉर्डरवर ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम शक्ती प्रदर्शन करून केला जातो. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान मधील सैन्य हे शक्तिप्रदर्शन करून आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. आणि तो नयनरम्य नजारा बघण्याचे आम्हाला भाग्य लाभले होते. हे सगळं एवढं भव्य होतं की ते शब्दात सांगावे कसे ते सुचत नाही. कार्यक्रम सहा वाजता सुरू होणार होता. चार ते सहा चक्क दोन तास त्या स्टेडियम मध्ये बसून आम्ही आपल्या सैन्याला मानवंदना देत तिथे वाजत असलेल्या देशभक्तीपर गाण्यांवर मनमुराद नाचत होतो.
आम्हा फ्रीडम मोटो रायडरच्या त्या उत्साहाचा जोरच वेगळा होता. वेळी तिथले वातावरण प्रचंड उष्ण होते आम्ही सर्व चक्क घामाने न्हायले होतो. परंतु स्टेडियम मध्ये असलेले कर्नल वेळोवेळी माइक वरून नारे देत आणि भारत माता की जय वंदे मातरम असे उद्गार काढून आमचा उत्साह वाढवत होते. बघता बघता संपूर्ण स्टेडियम भरले. काही वेळापूर्वी सबंध स्टेडियम रिकामे होते आणि एका तासात स्टेडियम मध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा उरली नाही. लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता आणि कार्यक्रम सुरु झाला.
समोरच्या बाजूला बघतो तर काय पाकिस्तान संपूर्ण खाली. काही बोटावर मोजण्या इतके लोक सोडले तर तिकडे कोणीही नव्हते त्यावेळीच भारतीयांचे देशावरचे प्रेम आणि भारताबद्दलची आत्मीयता डोळ्यात पाणी आणत होती. एवढा तो उत्साह. आता दोन्हीकडचे सीमा जवान आपापल्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करू लागले आणि मग थोड्या वेळानंतर डॉग स्कॉड इत्यादींचे प्रदर्शन सगळे करून झाल्यावर दोन्ही देशाचे ध्वज नियमानप्रमाणे खाली उतरवण्यात आले. आणि कार्यक्रमाची सांगता झाली. परंतु आम्हा फ्रीडम मोटो राइडर्सला त्या पथावर बोलवण्यात आले. इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर लष्कराच्या कर्नल, मेजर आणि सर्व जवानांसोबत आम्हा 75 रायडर्सचा फोटो काढण्यात आला. अंगावर शहारे आणणारा हा सर्व कार्यक्रम मी माझ्या डोळ्यात टिपला होता.
(क्रमशः)
वाघा बॉर्डरवर बाईक रॅलीचे असे झाले जंगी स्वागत pic.twitter.com/B7g9JNI0nG
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) January 4, 2023
सौ दिपिका दुसाने इंदिरानगर, नाशिक मो. 7972479858
Column Bullet Bike India Ride Experience by Deepika Dusane