मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अतिशय जंगी स्वागत… अंगावर शहारे आणणारे क्षण… अदभुत म्हणावं असंच सारं….. बाईक रॅलीच्या थरारात काय होतं ते?

by Gautam Sancheti
जानेवारी 4, 2023 | 9:57 pm
in इतर
0
IMG 20221227 WA0014

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
बुलेटवरील भारत भ्रमंतीचा थरार भाग ३
अटारी वाघा बॉर्डरवरील अनपेक्षित आणि अदभुत अनुभव

गेल्या काही भागापासून आपण बाईक राईडचा विलक्षण अनुभव जाणून घेत आहोत. आज आपण एक अद्भुत आणि विलक्षण अनुभव प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत. तो आहे अटारी वाघा बॉर्डरचा….

Dipika Dusane
सौ दिपिका दुसाने
इंदिरानगर, नाशिक
मो. 7972479858

जालंदरहून लंच करून निघाल्यानंतर अमृतसरला पोहोचण्याच्या आधी आम्हा सर्वांना अटारी वाघा बॉर्डरची व्हिजिट करायचे होते. साधारण संध्याकाळी चार वाजता आम्ही अटारी वाघा बॉर्डर वर पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर बघतो तर काय? भारतीय जवानांनी आमच्या स्वागतासाठी अतिशय उत्साहात मोठमोठे बॅनर लावले होते. आणि त्या जवानांनी फुलांच्या माळा आम्हा प्रत्येक फ्रीडम मोटो रायडरच्या गळ्यात घालून अगदी जल्लोषात आमचे स्वागत केले. त्यावेळी कुठल्याही इंटरनॅशनल बॉर्डरला भेट देण्याची माझ्या आयुष्यातली आणि माझ्यासारख्या इतर रायडर्सच्या आयुष्यातली ती प्रथमच वेळ होती. एवढा मान सन्मान एवढी आपुलकी डोळे पाणवले होते.

दररोज अटारी वाघा बॉर्डरवर ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम शक्ती प्रदर्शन करून केला जातो. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान मधील सैन्य हे शक्तिप्रदर्शन करून आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. आणि तो नयनरम्य नजारा बघण्याचे आम्हाला भाग्य लाभले होते. हे सगळं एवढं भव्य होतं की ते शब्दात सांगावे कसे ते सुचत नाही. कार्यक्रम सहा वाजता सुरू होणार होता. चार ते सहा चक्क दोन तास त्या स्टेडियम मध्ये बसून आम्ही आपल्या सैन्याला मानवंदना देत तिथे वाजत असलेल्या देशभक्तीपर गाण्यांवर मनमुराद नाचत होतो.

आम्हा फ्रीडम मोटो रायडरच्या त्या उत्साहाचा जोरच वेगळा होता. वेळी तिथले वातावरण प्रचंड उष्ण होते आम्ही सर्व चक्क घामाने न्हायले होतो. परंतु स्टेडियम मध्ये असलेले कर्नल वेळोवेळी माइक वरून नारे देत आणि भारत माता की जय वंदे मातरम असे उद्गार काढून आमचा उत्साह वाढवत होते. बघता बघता संपूर्ण स्टेडियम भरले. काही वेळापूर्वी सबंध स्टेडियम रिकामे होते आणि एका तासात स्टेडियम मध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा उरली नाही. लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता आणि कार्यक्रम सुरु झाला.

समोरच्या बाजूला बघतो तर काय पाकिस्तान संपूर्ण खाली. काही बोटावर मोजण्या इतके लोक सोडले तर तिकडे कोणीही नव्हते त्यावेळीच भारतीयांचे देशावरचे प्रेम आणि भारताबद्दलची आत्मीयता डोळ्यात पाणी आणत होती. एवढा तो उत्साह. आता दोन्हीकडचे सीमा जवान आपापल्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करू लागले आणि मग थोड्या वेळानंतर डॉग स्कॉड इत्यादींचे प्रदर्शन सगळे करून झाल्यावर दोन्ही देशाचे ध्वज नियमानप्रमाणे खाली उतरवण्यात आले. आणि कार्यक्रमाची सांगता झाली. परंतु आम्हा फ्रीडम मोटो राइडर्सला त्या पथावर बोलवण्यात आले. इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर लष्कराच्या कर्नल, मेजर आणि सर्व जवानांसोबत आम्हा 75 रायडर्सचा  फोटो काढण्यात आला. अंगावर शहारे आणणारा हा सर्व कार्यक्रम मी माझ्या डोळ्यात टिपला होता.
(क्रमशः)

https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1610666653393768450?t=SKkWwShGiKMSbbREMO2AIQ&s=09

सौ दिपिका दुसाने इंदिरानगर, नाशिक मो. 7972479858
Column Bullet Bike India Ride Experience by Deepika Dusane

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचे आज आर्थिक अंदाज अचूक ठरतील; जाणून घ्या, गुरुवार ५ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हा आहे जीवनात यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250909 123855 WhatsApp
संमिश्र वार्ता

राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु…वाहतुकीची कोंडी

सप्टेंबर 9, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
संमिश्र वार्ता

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू…आज या संघा दरम्यान सामना

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

मी पुराव्याशिवाय बोलत नाही, पण, हे खरं आहे काय? रोहित पवार यांचे मंत्री बावनकुळे यांना प्रश्न

सप्टेंबर 9, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

सप्टेंबर 9, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी…बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mou1 1024x496 1
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

सप्टेंबर 9, 2025
Untitled 5
मुख्य बातमी

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान…महाराष्ट्राच्या या नेत्यावर मोठी जबाबदारी

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी SIT स्थापन…रोहित पवारांकडून स्वागत

सप्टेंबर 9, 2025
Next Post
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण - विचार पुष्प - हा आहे जीवनात यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011