शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

थंडी… गारठा… पाऊस… ढगाळ हवामान… असा आहे महाराष्ट्राचा हवामान अंदाज

by Gautam Sancheti
जानेवारी 5, 2023 | 3:47 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
cold wave winter e1671450852736

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
फक्त आजपर्यन्तच महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण वगळता खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात आज गुरुवार दि.५ जाने. रोजी ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातही तरीदेखील किमान तापमान सरासरीपेक्षा काहीसे घसरलेलेच असुन थंडीचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात जाणवतच आहे.

पश्चिमी झंजावाताची व्यापकता उत्तर भारताबरोबरच दक्षिण मध्य प्रदेशातील बारवणी, निमर, बेतुल, बुऱ्हाणपूर, च्छिन्दवाडा, बालाघाट पर्यन्त पोहोचली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ ते विदर्भातील बुलढाण्यापर्यन्त पसरलेल्या व जमिनीपासून दिड किमी उंची पर्यंतच्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. जमिनीलगत असलेली आर्द्रता व थंड, मंद झुळूक वारा ह्या सर्व एकत्रित वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रात दोन दिवसाकरिता ढगाळ वातावरण व पाऊस हा झालेला बदल उद्यापासून निवळेल.

उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. सध्या देशाच्या भूभागावरुन जात असलेल्या पश्चिमी झंजावाताबरोबर अजून दोन पश्चिमी झंजावात येणे अपेक्षित आहेत. एका पाठोपाठ ते देशाच्या उत्तरेकडील राज्यात मार्गस्थ होवून महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव टिकून ठेवतील.
तसेच पुढील काही दिवसात किमान तापमानात सध्यापेक्षा अधिक हळूहळू घसरण होवून हवेत गारवा वाढण्याची शक्यता जाणवते.

Cold Winter Forecast Weather Climate Rainfall

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथे बिबट्या जेरबंद

Next Post

परदेशातून आलेल्या ११ जणांमध्ये आढळला कोरोनाचा तो विषाणू; अशी आहेत त्याची लक्षणे, आता पुढे काय?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Covid Airport e1671872295775

परदेशातून आलेल्या ११ जणांमध्ये आढळला कोरोनाचा तो विषाणू; अशी आहेत त्याची लक्षणे, आता पुढे काय?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011