नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांनी मध्यरात्रीपासून वाढ झाली असून हे दर आता ९५.९० प्रति किलो झाले आहे. याअगोदर हे दर ९१.९० प्रति किलो होते. या दरवाढीमुळे सीएनजीचा वापर करणा-या वाहनधारकांनी संताप व्यक्त केला जात आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल डिझेलच्या दराच्या आसपास हे दर गेले आहे. देशात पेट्रोल – डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतांना अनेक जणांनी सीएनजीचा वापर करणे सुरु केले. या वापरामुळे त्यांची बचत होत होती. पण, त्यानंतर आता सीएनजीच्या दरातच वाढ झाल्यामुळे वाहनधारक संतप्त झाले आहे. गेल्या काही महिन्यात सीएनजीचे हे दर प्रति किलो ३५ ते ३६ रुपये वाढले आहे. एप्रिलच्या पहिल्या हे दर प्रति किलो ७१ रुपये एवढे होते. मंगळवारी नागपूरमध्ये सीएनजी मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचप्रमाणे दरवाढीचा प्रश्नही येथे उपस्थितीत केला गेला. आता नाशिकमध्ये हे दर वाढल्यामुळे सीएनजी वापर करणारे वाहन धारक संतप्त झाले आहे.