गुरूवार, ऑक्टोबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

CNG आणि PNG दराबाबत मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

ऑगस्ट 12, 2022 | 2:05 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
CNG Gas

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजीच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. याची गंभीर दखल केंद्रातील मोदी सरकारने घेतली आहे. त्यामुळे यासंदर्भात सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसात सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

पेट्रोलियम उद्योगांना पुरवठा होणारा नैसर्गिक वायू शहर गॅस वितरक क्षेत्राला देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना स्वस्त दरात सीएनजी आणि पीएनजी मिळावेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारच्या नव्या आदेशानंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या सीएनजी आणि स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या पीएनजीच्या किमतीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयात तेल आणि नैसर्गिक वायूंवरील अवलंबित्व अधिक वाढल्याने किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हैरान झाले आहेत.

वाहनांमध्ये सीएनजी आणि घरांमध्ये पीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयात केल्या जाणाऱ्या एलएनजीच्या वापरास सरकारने तीन महिन्यांपूर्वी परवानगी दिली होती. आयात केलेला गॅस महाग असला तरी घरे व वाहनांचा पुरवठा भागवावा लागत असल्याने दुसरा पर्याय नव्हता. आता सरकारने तीन महिन्यांपूर्वीचा आदेश फिरवला आहे. शहरी गॅस ऑपरेटर्सना फक्त देशांतर्गत उत्पादित गॅसचा पुरवठा केला जाईल आणि हे ऑपरेटर आयात केलेला गॅस घेणार नाहीत, असा आदेश यापूर्वी सरकारने दिला होता. आता यामध्ये बदल झाल्याने किंमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक वायू हा सीएनजी आणि पीएनजी बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल आहे. हा नैसर्गिक वायू मुंबई हाय आणि अरबी समुद्रात असलेल्या खोऱ्यातून काढला जातो. त्यानंतर त्यापासून सीएनजी आणि पीएनजी बनवले जाते. देशात नैसर्गिक वायूचे उत्पादन पुरेसे नसल्याने सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा अखंडपणे सुरू ठेवता येईल. त्यामुळे सरकार परदेशातून जहाजांमध्ये एलएनजी आयात करते. त्यानंतर त्या एलएनजीपासून सीएजी आणि पीएनजी गेलसारख्या प्लांटमध्ये बनवले जातात आणि शहर गॅस वितरण क्षेत्राला पुरवले जातात. तिथून गॅस घरोघरी आणि सीएनजी फिलिंग स्टेशनवर पाठवला जातो.

तेल मंत्रालयाच्या अधिकार्‍याने या विषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईतील महानगर गॅस लिमिटेड या शहर गॅस ऑपरेटरचा पुरवठा पूर्वीच्या १७.५ दशलक्ष मानक घनमीटरवरून २०.७८ एमएमएससीएमडी इतका वाढवण्यात आला आहे. ९४ टक्के वाढीव पुरवठ्याचा वापर वाहनांमध्ये सीएनजी आणि घरांमध्ये पीएनजीसाठी करण्यात येईल.

नैसर्गिक वायूचा हा वाटा देशात तयार होणाऱ्या गॅसमधून भागवला जाणार आहे. पूर्वी केवळ ८३ – ८४ टक्के गॅस देशातून येत होता, उर्वरित गॅस गेल कंपनी आयात करत होती. आता आयात गॅस व तेलावरचे अवलंबित्व कमी करून घरगुती क्षेत्राकडे सरकारने मोर्चा वळविला आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या किंमती कमी होतील आणि खर्च कमी होऊन सीएनजी-पीएनजीच्या किमती घसरतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

CNG PNG Rates Modi Government Big Decision Soon
Compressed Gas
Natural Gas

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोठा निर्णय! जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री होणार बंद

Next Post

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांना भरला हा सज्जड दम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार…

ऑक्टोबर 2, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो
इतर

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

ऑक्टोबर 2, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

ऑक्टोबर 2, 2025
st bus
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द…

ऑक्टोबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या कार्यास गती येईल, जाणून घ्या, गुरुवार, २ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 2, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
संमिश्र वार्ता

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण….राज्यभरातील या १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

ऑक्टोबर 1, 2025
Next Post
Eknath Shinde Devendra Fadanvis e1660037599940

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांना भरला हा सज्जड दम

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011