शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ST संपाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल; म्हणाले…..

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2021 | 2:29 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
cm meeting 1 1140x570 1

मुंबई – राज्यभरात एसटी कर्मचारी संघटनांनी संप सुरू केल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच, दिवाळीच्या सुटीनिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप आणि आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे त्याचा मोठा प्रभाव सध्या राज्यात दिसून येत आहे. संपाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात गेला. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या बैठका आणि कामही सुरू झाले आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब हे कर्मचारी संघटनांशी चर्चा करीत असले तरी तोडगा निघालेला नाही. आम्हाला सरकारी सेवेत सामावून घ्या यासह अन्य मागण्यांवर कर्मचारी संघटना ठाम आहेत. अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाची दखल अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी एसटी कामगार संघटना आणि कर्मचारी यांना कळकळीचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.

अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी #एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन pic.twitter.com/6XffAqLWn5

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 10, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राफेल डीलमध्ये नाव आलेला मध्यस्थ सुशेन गुप्ता आहे तरी कोण?

Next Post

पिंपळगाव बसवंत: माथाडी कामगार संपाचा कांदा लिलावाला फटका; ६ कोटींची उलाढाल ठप्प

Next Post
IMG 20190703 WA0081 1

पिंपळगाव बसवंत: माथाडी कामगार संपाचा कांदा लिलावाला फटका; ६ कोटींची उलाढाल ठप्प

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250517 144809 WhatsApp

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025
INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011