मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस चक्क नौपाडा पोलिस ठाण्यात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त पोलिसांना गणवेश वाटपही करण्यात आले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. यापुढे सर्वच आमदार आणि खासदार या लोकप्रतिनिधींचे वाढदिवस पोलिस ठाण्यात साजरे करण्याची मुभा सरकारने द्यावी. तशी मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. परांजपे यांनी म्हटले आहे की, खरंतर गणवेश वाटप हे गृह विभागतर्फे केले जाते. पण मुख्यमंत्र्यांचे स्वतःला सुपर सीएम समजणारे चिरंजीव हे असे विशेष कृत्य गृहखात्याच्या परवानगीने करत आहेत की गृहखाते व गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून याचा खुलासा आता व्हायला हवा, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1622519422274641920?s=20&t=_eRT4s3yAULdocdRjwFhiQ
https://twitter.com/DrSEShinde/status/1621791474479407104?s=20&t=_eRT4s3yAULdocdRjwFhiQ
CM Son Shrikant Shinde Birthday Celebration in Police Station