नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर येथील हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजते आहे. कर्नाटकच्या विधिमंडळ अधिवेशनात या प्रश्नी विविध ठराव केले जात असताना सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार गप्प का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. सीमावादाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र, कर्नाटककडून मराठी भाषिकांचा छळ सुरू आहे. याची दखल घेत कर्नाटकव्याप्त सीमाभाग तूर्त केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल विधान परिषदेत केली होती. अखेर आता या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये ठराव मांडला आहे. याप्रश्नी सर्व ताकदीनीशी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली जाईल. मराठी भाषिक गावे व शहरे महाराष्ट्रात आली पाहिजेत. त्यांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभे आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा ठराव वाचून दाखविला. हा ठराव एकमताने मंजूर झाला आहे.
बघा या ठरावाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1607637838098489345?s=20&t=iRbgV1p-lQZ1W4BIZVAoLw
CM Shinde on Maharashtra Karnataka Border Dispute Video