India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकातील अनेक नेते, पदाधिकारी नागपूरकडे; शिंदे गटात कोण कोण प्रवेश करणार?

India Darpan by India Darpan
December 27, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यातून पुन्हा एकदा पक्षांतरासाठी अनेक नेते आणि पदाधिकारी नागपूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. केवळ शिवसेनेच्या ठाकरे गटच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षातील पदाधिकारीही शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत. आज रात्री हा प्रवेश सोहळा नागपुरात होणार असल्याचे सांगितले जाते. त्यात कोण कोण सहभागी होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पाच महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० पेक्षा आमदारांनी बंड केले. त्यानंतर १३ खासदारही शिंदे गटाक सहभागी झाले. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत राज्यामध्ये सरकार स्थापन केले आहे. नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे, तत्कालिन मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर ठाकरे गटाला नासकात हादरे बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे तब्बल ११ माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. त्यात माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांचाही समावेश आहे. यास काही दिवस उलटत नाही तोच नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनीही शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. आता बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात त्यांना सचिवपदी बढती मिळाली आहे. आणि आता माजी आमदारांसह काही पदाधिकारीही नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले, नाशिक महापालिकेच्या माजी नगरसेविका मंदिकिनी जाधव, मनसेच्या माजी नगरसेविका मेघा साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरिश भडांगे आदींसह अनेक पदाधिकारी व नेते नागपूरकडे रवाना झाले आहेत.

हे सर्व जण समृद्धी महामार्गाने नागपूर गाठणार आहेत. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह बाळासाहेबांची शिवसेनाचे अनेक पदाधिकारी नागपुरातच आहेत. आज रात्री होणाऱ्या या प्रवेश सोहळ्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. शिंदे गटात नक्की कोण कोण प्रवेश करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Nashik Political Leaders Today Join Shinde Group
Nagpur Politics Eknath Shinde Balasahebanchi Shivsena


Previous Post

अखेर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मांडला हा ठराव; विधानसभेत एकमताने मंजूर (व्हिडिओ)

Next Post

संतप्त वॉर्ड बॉयने महिला डॉक्टरवर कात्रीने केला प्राणघातक हल्ला; कामात हलगर्जीपणा केल्याचा जाब विचारल्याचा राग

Next Post
प्रातिनिधीक फोटो

संतप्त वॉर्ड बॉयने महिला डॉक्टरवर कात्रीने केला प्राणघातक हल्ला; कामात हलगर्जीपणा केल्याचा जाब विचारल्याचा राग

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group