नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही मग शाळेत सरस्वतीची पूजा का करायची ?”, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केल्यानंतर त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता त्यांना भुजबळांच्या या भूमिकेबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कुठले फोटो काढले जाणार नाही, कुणाला काय वाटते ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं ते आम्ही करणार असे सांगत भुजबळांना ठणकावले.
सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव नुकताच पार पडला. यावेळी आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना भुजबळ यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शाळेत सरस्वती देवीची पूजा का करायची ? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.. सरस्वतीने आम्हाला शिकवले नाही असेही भुजबळ म्हणाले. देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का ? पाहिले असेल तरी फक्त ३ टक्के लोकांना सरस्वती देवीने शिकवले असेल असं भुजबळ म्हणाले. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे, शाळांमध्ये फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणीही भुजबळांनी केली. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
CM Eknath Shinde on Chhagan Bhujbal Statement