India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खोटे प्रमाणपत्र देणा-या खासगी डॅाक्टराला पोलिसांनी नंदूरबार जिल्ह्यातून घेतले ताब्यात

India Darpan by India Darpan
September 28, 2022
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक ग्रामीण पोलिस दलात आंतरजिल्हा बदलीसाठी खोटे प्रमाणपत्र देणा-या खासगी डॅाक्टराला पोलिसांनी नंदूरबार जिह्यातील खापर येथून अक्कलकुवा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या डॅाक्टरला ग्रामिण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा डॅाक्टर आपल्या एका नातेवाईकाबरोबर होता. आता पोलिस पथक दोघांना घेवून नाशिकच्या दिशेने निघाले आहे. डॉ. स्वप्निल सैंदाणे असे अटक करण्यात आलेल्या संशयित खासगी डॉक्टरचे नाव आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस दलात आंतरजिल्हा बदल्यांमध्ये खोटे प्रमाणपत्र वापरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. या प्रकरणात सोळा पोलिस अर्जदारांनी सादर केलेले अहवाल सदोष असल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा पोलिस तपास घेत असतांना प्रभावती (यापूवीर्चे स्पंदन), साईछत्र, गणेश मल्टिस्पेशालिस्ट या रुग्णालयांच्या नावाने बनावट अहवाल सादर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यापैकी साईछत्र हे रुग्णालय कोरोना काळापुरतेच सुरू राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे सर्व अहवाल डॉ. स्वप्नील सैंदाणे याने दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. बीएएमएस ही पदवी असतांना संशयिताने एमडी डॉक्टर असल्याचे भासवून हा उद्योग केल्याचे सूत्रांनी सांगितले.

असा घेतला शोध
नाशिक तालुका पोलिस ठाण्याची पथके डॉ. स्वप्नील याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा फोन नॉट रिचेबल असल्याने लोकेशन मिळत नव्हते. पण, दोन दिवसांपूर्वी धुळ्यात असल्याचे समजले. मात्र, त्याने तिथून पळ काढला. यानंतर पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याचा माग काढला. मंगळवारी सायंकाळी डॉ. स्वप्नील याला नंदूरबार जिह्यातील खापर ता.अक्कलकुवा येथे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्या एका नातेवाईकासही बेड्या ठोकण्यात आल्या असून बुधवारी (दि.२८) दोघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. संशयितांच्या चौकशीत या प्रकरणाचा भांडाफोड होण्याची शक्यता असून खासगी रुग्णालयातील संशयित व अहवाल तयार करणा-यांची माहिती पुढे येईल असा विश्वास पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.


Previous Post

नाशिकचे स्वामी नारायण मंदिर हे शहराची शोभा वाढवेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

छगन भुजबळांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले हे खणखणीत उत्तर

Next Post

छगन भुजबळांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले हे खणखणीत उत्तर

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group