India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एकनाथ शिंदेंचा कारभार मनमानी… मुंबई हायकोर्टाने केली कानउघडणी… दिले हे स्पष्ट आदेश

India Darpan by India Darpan
May 24, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कारभार मनमानी असल्याची बाब मुंबई उच्च न्यायालयासमोरच उघड झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक रोखल्या प्रकरणी यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. तसेच ही निवडणूक तातडीने घेण्याचे आदेशही दिले होते. असे असतानाही शिंदे यांनी आता थेट नवनिर्वाचित संचालकांनाही अपात्र ठरविण्याची कार्यवाही सुरू केल्याने उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा खडसावले आहे.

सभापती, उपसभापती निवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पणन खातेही आहे. त्यांच्यापुढे झालेल्या एका सुनावणीत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड रोखण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि इतरांविरुद्ध आर्थिक अनियमिततेचा आरोप होता. त्याची दखल घेऊन चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र, पुढे त्यात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २०२१ मध्ये, तक्रार करणाऱ्याने मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर अलीकडेच सुनावणी झाली.

राष्ट्रवादी म्हणून
याप्रकरणात ८ मे रोजी याचिकाकर्त्यांनी निवडणूक अधिकारी तसेच सहकारी संस्थांचे उपनिबंधक यांना पहिली बैठक बोलावून निवडणूक घेण्याचे पत्र पाठवले. मात्र, याचिकाकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न असल्याने सरकार निवडणुका पुढे ढकलत असल्याचे लक्षात येताच याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली. परंतु, जोपर्यंत प्रलंबित असलेले अपील निकाली निघत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, अपील प्रलंबित असल्याने याचिकाकर्त्यांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून निवडून येण्याच्या अधिकारापासून परावृत्त करता येणार नाही, असा दावा उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून करण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला प्रलंबित अपीलावर शिंदे यांच्यासमोर सुनावणी होईपर्यंत निवडणुका न घेण्याचे आदेश देणाऱ्या राज्य सरकारच्या ९ मेच्या आदेशाला नाशिक बाजार समितीच्या नऊ नवनिर्वाचित सदस्यांनी दोन स्वतंत्र याचिकांमार्फत आव्हान दिले.

न्यायालयाचे निरीक्षण
कायद्यात तरतूद असूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी चुकीचे आदेश पारीत करून निवडणूक प्राधिकरणाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका घेण्यापासून रोखले. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र आहे. निवडून आलेल्या व्यक्तीला त्यांचे अधिकार वापरण्यापासून प्रतिबंधित करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाच्या आदेशाशिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना अपात्र ठरवता येणार नाही, असे निरीक्षण न्या. अमित बोरकर आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे.

आता सदस्य अपात्रतेसाठी
नाशिक बजार समितीच्या सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला (एससीईए) देण्यात आले होते. या आदेशानंतर पणन विभागाकडे तक्रारकर्त्यांच्या प्रलंबित अपीला संदर्भात बैठक झाली. त्यामध्ये नवनिर्वाचित सदस्यांची बाजू ऐकून घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, त्यांना थेट अपात्र ठरविण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली. ही बाब लक्षात घेता सदस्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आता न्यायालयाने या प्रक्रियेलाही स्थिगिती दिली आहे.

२६ जूनला पुढील सुनावणी
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन कायद्याच्या कलम ५३ (निधीचा गैरवापर) अंतर्गत प्राधिकरणाला निवडणूक घेण्यापासून रोखता येणार नाही, ही याचिकाकर्त्यांची बाजू प्रथमदर्शनी ग्राह्य धरून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बैठक आयोजित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच अपील प्रलंबित असल्याचे अथवा चौकशी सुरू असल्याचे कारण पुढे करून बैठक टाळता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ जूनला होणार आहे.

CM Eknath Shinde Mumbai High Court Order


Previous Post

साराभाई फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा अपघातात मृत्यू

Next Post

वडील, मुलगा, सून… एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने नवापूर हादरले… कारण ऐकून पोलिसही थक्क झाले….

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

वडील, मुलगा, सून... एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने नवापूर हादरले… कारण ऐकून पोलिसही थक्क झाले....

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

आधी चोरी केली… नंतर चोरानेच परत केले १५ तोळे सोने… चर्चा तर होणारच… पालघरमध्ये नेमकं काय घडलं?

June 9, 2023

मंदिराच्या आवारात घेतला किस; ‘आदिपुरुष’फेम क्रिती सेनॉन आणि ओम राऊत ट्रोल

June 9, 2023
प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group