मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात आज नाताळचा सण उत्साहात साजरा होत आहे. याचनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, प्रभू येशू ख्रिस्तांनी जगाला शांती, प्रेमाचा संदेश दिला. यातून प्रेरणा घेऊन आपण एकमेकांचा आदर करूया, परस्परांची काळजी घेऊया. ख्रिस्त जन्मोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख,समृद्धी आणि सौहार्दाचे क्षण घेऊन येवो यासाठी हार्दिक शुभेच्छा.
https://twitter.com/maha_governor/status/1606802096292257792?s=20&t=s_7MGR1xabcp6AwlFp_img
Christmas CM Shinde Governor Koshyari Wishes