India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होणार? त्यावरुन काही वाद आहे का? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं…

India Darpan by India Darpan
July 28, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात स्थापन झालेल्या सरकारला आता महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. तो नेमका का होत नाही, त्यामागे काय कारण आहे याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, आज यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. यासंदर्भात आज माध्यमांनी विचारले असता शिंदे म्हणाले की, थोडा विलंब जरुर झाला आहे पण कुठलाही वाद नाही. येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार करु. यासंदर्भात कोणताही भेदभाव केला गेलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्ली दौरा रद्द का करावा लागला, याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे चार वेळा दिल्लीला गेले आहेत, यातल्या बहुतेकवेळा ते मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी गेले असल्याचे सांगितले गेले आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता एका महिन्यापेक्षा जास्तचा काळ लोटला आहे. तसंच त्यांच्या शपथविधीलाही दोन दिवसांनी एक महिना पूर्ण होईल. 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर प्रत्येकवेळी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगण्यात येत आहे, पण याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.

विरोधकांनीही राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे टीका केली आहे. विदर्भ-मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे कोणत्याच जिल्ह्याला पालकमंत्री नाही. तसंच सरकारकडून मदत पोहोचत नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मुख्य म्हणजे विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशनही अजून झालेलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या भवितव्याबाबतची सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही ? असा प्रश्नही विचारला जात आहे.

विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच अतिवृष्टी व पूरामुळे शेतजमिन आणि पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावे. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/KJycVAcvOc

— NCP (@NCPspeaks) July 25, 2022

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि काही बैठकांनंतर शिंदे दिल्लीला रवाना होणार होते. आज त्यांचा दिल्लीत मुक्काम होता. ते कोणाला भेटणार, याबाबत त्यांच्या कार्यालयाने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत काही ज्येष्ठ वकिलांशी ते चर्चा करणार होते आणि भाजपच्या श्रेष्ठींनादेखील विस्ताराच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी भेटणार होते, अशी माहिती आहे. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज दिल्लीला गेले आहेत. ते २९ जुलै रोजी मुंबईत परततील. त्यामुळे दोन दिवस तरी विस्तार होणार नाही, असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आतापर्यंत चार वेळा दिल्लीला जाऊन आले आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते 1 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपती, जे पी नड्डा, राजनाथ सिंग आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दुसऱ्यांदा 8 जुलै रोजी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अभित शाह यांची भेट घेतली. तिसऱ्यांदा ते 18 जुलै रात्री दिल्लीला रवाना झाले. यानंतर 22 जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला हजर राहण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. यानंतर 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते दिल्लीला गेले होते.

महाराष्ट्रातील विविध भागात पूर परिस्थिती आहे. गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नाशिक असा अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. @Jayant_R_Patil pic.twitter.com/2zDS9vAowI

— NCP (@NCPspeaks) July 28, 2022

मंत्रिमंडळाची काल म्हणजेच बुधवारची बैठकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच उपस्थितीत झाली. नवीन सरकार आल्यानंतरची ही चौथी बैठक होती. पहिली बैठक शपथविधीच्या दिवशी म्हणजे दि. ३० जूनला झाली होती. त्यानंतर दि. १४ आणि १६ जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली होती. दरम्यान, शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून वारंवार टीका केली जात आहे. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून राज्यातील जनता वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधक करत आहे. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

Chief Minister Eknath Shinde on Cabinet Expansion Politics


Previous Post

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर; ८ गणांपैकी ७ गण अनुसूचित जमातीसाठी राखीव

Next Post

मुंबईतील खड्डे आणि वाहतूक कोंडी याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; प्रशासनाला दिले हे निर्देश

Next Post

मुंबईतील खड्डे आणि वाहतूक कोंडी याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; प्रशासनाला दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group