शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्या नाशकात; या भव्य कार्यकर्माला राहणार उपस्थित

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2022 | 3:47 pm
in स्थानिक बातम्या
0
Shinde Koshyari

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदिवासी विभागाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 15 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 3 वाजता आदिवासी जनजातीय दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. या महोत्सवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

देशभरातील आदिवासी समुदायांच्या कला संस्कृतीचे तसेच स्वातंत्र्यलढा व राष्ट्र निर्मितीमधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचे स्मरण व त्यांचा गौरव करण्यासाठी आदिवासी जनजातीय दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि.15 ते 18 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत गोल्फ क्लब मैदान, नाशिक येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत, पारंपरिक नृत्य स्पर्धा सायंकाळी 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत, 17 व 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8.30 वाजता लघुपट महोत्सव होणार आहे. तसेच या महोत्सवात आदिवासी बांधवांच्या हस्तकलांचे साधारण 210 स्टॉल लावण्यात येणार असून अंदाजे 42 नृत्यपथके या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

या महोत्सवास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, डॉ. सुभाष भामरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, छगन भुजबळ, किशोर दराडे, दिलीप बोरसे, ॲड माणिकराव कोकाटे, मोहम्मद खालिक, दिलीप बनकर, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, सीमा हिरे, ॲड राहुल ढिकले, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज अहिरे यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम व तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

Chief Minister and Governor Nashik Tour
Eknath Shinde Bhagat Singh Koshyari Trible Cultural Program

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काम करत असतांना आठव्या मजल्यावरुन पडल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

भरधाव दुचाकी घसरल्याने २० वर्षीय युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

Next Post
प्रातिनिधीक फोटो

भरधाव दुचाकी घसरल्याने २० वर्षीय युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011