नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विंचूरगवळी फाटा भागात भरधाव दुचाकी घसरल्याने २० वर्षीय युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रथमेश दिलीप नवले (रा.नवले वस्ती,जकातनाका आडगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रथमेशवर आडगाव मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रथमेश विंचुर गवळी येथे जात असतांना हा अपघात झाला होता. आपल्या दुचाकीवर तो प्रवास करीत असतांना विंचुर गवळी फाटा येथे भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. डोक्यास व चेह-यास गंभीर दुखापत झाल्याने वडिल दिलीप नवले यांनी त्यास तातडीने आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना रविवारी त्यास डॉ. प्राजक्ता दाते यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.