चांदवड – चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव गावाकडून खेडगाव बाजुकडे जाणा:या रोडवर सप्तश्रृंगी माता द्राक्ष व्यापा:यांच्या गाळ्याजवळ पिकअप सारख्या अज्ञात वाहनावरील चालक (नाव गाव माहित नाही) याने कट मारल्याने नितीन रामदास पटाईत (३३) रा. आंबेडकरनगर दिंडोरी मुळ रा. कळवण हा ३१ जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वडनेरभैरव गावाकडून खेडगावकडे जात असतांना पिकअप सारख्या वाहनाने धडन दिल्याने नितीन पटाईत यास डोक्यास गंभीर दुखापत झाली त्याचेवर नाशिक येथील शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद संतोष रामदास पटाईत यांनी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला ६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा अपघाताचे कागदपत्रे वणी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचा:यांनी पाठविल्याने वडनेरभैरव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस.डी.वाघ हे करीत आहेत.