चांदवड- आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पाश्वभूमिवर नाशिक ग्रामिण मध्ये शिवसेना नेते ,उत्तर महाराष्ट्र विभागिय नेते खा. संजय राऊत व उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांचे सुचनेनुसार तसेच नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे मार्गदर्शनाने आज (दि.७) बुधवार रोजी निफाड ,येवला, लासलगाव, चांदवड, देवळा तालुक्यात आढावा बैठक घेण्यात आल्या, जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत सदर बैठका पार पडल्या यावेळी त्यांचेसमवेत उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील उपस्थितीत होते..
यावेळी जिल्हाप्रमुख पाटील यांनी गट निहाय उपतालुकाप्रमुख व विभागप्रमुख यांचे कडून मागील
विधानसभा, पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडणुकांमधील मतदानाचा घोषवारा घेवुन, गट-गणनिहाय बैठका घेण्यांच्या सुचना देऊन गावागावातील जेष्ठ शिवसैनिकांना सदिच्छा भेटुन अडीअचणी जाणुन घ्या, त्यांचेकडुन मार्गदर्शन घ्या, त्यांच्याशी कायम संपर्क ठेवा,आजी माजी पदाधिकार्यांच्या सदिच्छा भेट घ्यावी,तसेच आपल्या गटात किंवा शहरात काही कामे प्रलंबित असतील किंवा त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी असतील तसेच एखादा नवीन प्रस्ताव द्यायचा असेल तर त्याची माहीती त्वरीत देऊन,नवीन प्रस्ताव तालुकाप्रमुख यांचे मार्फत आमच्याकडे द्यावेत ते संपर्कप्रमुखांकडून ते मुख्यमंत्री व संबधीत खात्यांच्या मंत्रीपर्यंत नक्कीच जातील व कामे मार्गी लागतील असे जिल्हाप्रमुख पाटील यांनी सांगितले. सदर बैठकीस निफाड, येवला, लासलगाव ,चांदवड, देवळा येथे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख ,विधानसभा सह. संपर्कप्रमुख ,शहरप्रमुख ,विधानसभा संघटक , उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख ,उपस्थितीत होते.