चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडनेर भैरव येथे मजुरी करणाऱ्या नातेवाईकांमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या हाणामारी दोघांनी एका मजुराच्या डोक्यात दगड मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हिरामण जाधव असे मृत झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना गडाआड केले आहे.
मारहाणीची घटना घडल्यानंतर मारहाण करणारे जालिंदर जाधव व देवीदास पवार हे दोघेही घाबरले त्यांनी हिरामन याचा मृतदेह भास्कर शंकर तिडके या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत नेऊन टाकला. या घटनेनंतर वडनेर भैरव पोलिसांनी बारा तासात या खूनाचा उलगडा करुन दोन्ही आरोपींना गजाआड केले. त्यानंतर चांदवड न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
हिरामण जाधवने जालिंदर व देविदास यांना शिव्या दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर झालेल्या हाणामारीत जालिंदर व देविदास यांनी हिरामण जाधव यांच्या डोक्यात दगड मारला.या घटनेची माहिती वडनेर भैरव चे सहाय्यक पोलीस अधिकारी मयूर भामरे यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपी जालिंदर व देविदास यांना ताब्यात घेतले आहे,
त्यानंतर रात्री उशिरा या घटनेबाबत गुन्हाचा गुन्हा दाखल करुन संशयित आरोपींना गुरुवारी चांदवड न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठाडी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
✈️
*असे आहे नाशिक विमानसेवेचे वेळापत्रक*
बुकींगसाठी येथे साधा संपर्क
👇https://t.co/D8447sXlHr
*प्रायोजक : हॅप्पी व्हॅकेशन्स आणि कोकण पर्यटन संस्था*#indiadarpanlive #nashik #airservice #flight #schedule #indigo #spicejet— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 7, 2023