नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या वाहन खरेदी विक्रीच्या बाजारात कार खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने चक्कर मारण्याच्या बहाण्याने कार पळवून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमीर सैय्यद अली (३५, बागवानपुरा) व आनंद देवरे ( ३३ रा. मालेगाव) अशी कार पळवून नेणा-या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी सुरेश शिवाजी जाधव (रा. राजूर बहुला,विल्होळी) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव हे शुभम निमसे यांच्या मालकिच्या श्री सदगुरू कृपा या कार मॉल मध्ये काम करतात. दि.१६ जानेवारी रोजी दोघे संशयित जुन्या वाहन खरेदी विक्रीच्या बाजारात कार खरेदीच्या बहाण्याने मॉलमध्ये आले होते.
दोघांनी एक कार पसंत करीत मॅकेनिकला दाखवून आणतो असे म्हणत संशयितांनी मोटार फिस परत न करता कार पळवून नेली. दोन अडिच महिने शोध घेवूनही संशयित अथवा कार न मिळून आल्याने जाधव यांनी पोलिसात धाव घेतली असून,अधिक तपास सहाय्यक निरक्षक संतोष शिंदे करीत आहेत.
? *नोकरी करणाऱ्या मुंबईतील महिलांसाठी सुवर्णसंधी*
वसतीगृहात मिळेल मोफत प्रवेश
https://t.co/WCqN3lPVQY#indiadarpanlive #mumbai #working #womens #hostel #government #scheme— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 7, 2023
? *इयत्ता बारावीच्या परीक्षेत होणार हा मोठा बदल*
https://t.co/OAptKewhWY#indiadarpanlive #maharashtra #hsc #board #exam #pattern #change— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 6, 2023