चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – मनमाड जवळ असलेल्या चांदवड तालूक्यातील कातरवाडी येथे दोन दिवसापुर्वी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपलेल्या सोपान बाबुराव झाल्टे याचा डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला केल्याने ते जागीच ठार झाले होते. तर त्यांना वाचवायला गेलेल्या त्यांचे वडील जखमी झाले होते. सोपान यांची पत्नी मनीषा सोपान झाल्टे यांनी अज्ञात लोकां विरोधात चांदवड पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तक्रार दाखल करणा-या पत्नीला तिच्या दोन साथिदारांसह खूनाच्या आरोपात ताब्यात घेतल असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.