मधूर गुजराथी, चांदवड
चांदवड – चांदवड तालुक्यातील पाटे नारायणखेडे शिवारात मुलगा दारु पिऊन येऊ नको या कारणावरुन वडील मुलात वाद होऊन झालेल्या मारामारीत मुलाचा खून झाला असून चांदवड पोलीस स्टेशनला वडीलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत २४ जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलगा रविंद्र कारभारी ठोके ( ३२) हा दारु पिऊनघरी आला व वडील कारभारी रायबा ठोके यांना म्हणाला माङो लग्न करुन देणार नाही का ? तेव्हा वडील म्हणाले तू पहिले दारु बंद कर तेव्हा तो म्हणाला मी दारु बंद करणार नाही. असे म्हणून कुरापत काढून मुलाने वडीलांना शिवीगाळ केली व वडीलांना कोप-यात ठेवलेली लोखंडी पहार घेऊन वडीलाचे डोके फोडले. त्यामुळे वडील कारभारी यांनी लोखंडी पाईप व व पहारीने त्याचे डोक्यात हातापायावर जबर मारहाण केली. यात मुलगा रविंद्र कारभारी ठोके (३२) हा मरण पावला. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला प्रकाश कारभारी ठोके यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक समीरसिंग साळवे यांनी भेट दिली. या घटनेचा चांदवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.