कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेच्या महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग मधील अत्यंत रहदारीच्या पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रंदिवस सुपरफास्ट एक्सप्रेस, एक्सप्रेस, लांब पल्ल्याच्या गाड्या, पॅसेंजर आणि मालगाडया धावत असतात. तसेच कसारा पासून ते मुंबई सीएसटी पर्यंत देखील अनेक लोकल धावत असतात. परंतु या मार्गावर दर आठवड्याला काहीतरी तांत्रिक बिघाड किंवा छोटा मोठा अपघात होतो आणि रेल्वेसेवा विस्कळीत होते, असे अलीकडच्या काळात दिसून येत आहे.
वाशिंद आसनगाव दरम्यान मालगाडीत दि. २५ मे रोजी सकाळी बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. सहाजिकच सकाळी कामावरती निघालेल्या चाकरमनी तथा प्रवाशांना मोठा त्रास करावा लागत आहे. मध्य रल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाडी उशीराने येत आहेत.
रेल्वेत काही तांत्रिक समस्येमुळे मालगाडी वासिंद ते आसनगाव दरम्यान डाऊन मार्गावर थांबली आहे. मालगाडी सकाळी सहा वाजल्यापासून थांबली असल्याने दोन्ही बाजूला अनेक गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प पुर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच लोकल वेळेवर येत नसल्याने स्टेशनवर गर्दी वाढलेली दिसून आली आहे.
वाशिंद-आसनगाव दरम्यान बंद झालेल्या मालगाडी दुरुस्त करण्याचे काम रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले. त्यानंतर काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली आहे. परंतु सध्या मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या उशीराने धावत आहे. विशेष म्हणजे जानेवारीपासून गेल्या पाच महिन्यात मुंबई ते इगतपुरी या रेल्वे मार्गावर दर महिन्याला एक ते दोन गाड्यांचे किरकोळ अपघात, तांत्रिक बिघाड असे प्रकार घडत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वीच एक रेल्वेगाडी या मार्गावर घसरली होती.
https://twitter.com/ShivajiIRTS/status/1529271891457847296?s=20&t=7jcgfhWKorbIwPiwqGJazQ