इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने जून २०२५ पासून पुणे रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या आणि तिथून रवाना होणाऱ्या निवडक गाड्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेत सुधारणा जाहीर केल्या आहेत. प्रवाशांचे हित साधत वाहतूक सुव्यवस्थित करणे आणि वेळेच्या अचुकतेत सुधारणा करणे हा या बदलांमागचा उद्देश आहे आहे.
सुधारित वेळापत्रक:
पुण्यात थांबणारी गाडी:
ट्रेन क्रमांक 12127 सीएसएमटी-पुणे एक्सप्रेस
पुणे येथील आगमनाची सध्याची नियोजित वेळ : 09:57 वाजता
सुधारित आगमन वेळ : 10:00 वाजता
लागू होण्याची तारीख : 01.06.2025 रोजी आणि त्यानंतर
पुण्यातून सुरू होणाऱ्या गाड्या:
ट्रेन क्रमांक 22148 शिर्डी (एसएनएसआय) – दादर (डीआर) सुपरफास्ट एक्सप्रेस
शिर्डी (एसएनएसआय) येथून सध्याची प्रस्थानाची नियोजित वेळ : 07:25 वाजता
प्रस्थानाची सुधारित वेळ: 07:20 वाजता
लागू होण्याची तारीख : 07.06.2025 रोजी आणि त्यानंतर
ट्रेन क्रमांक 12126 पुणे – सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस
पुणे येथून सध्याची प्रस्थानाची नियोजित वेळ: 07:50 वाजता
प्रस्थानाची सुधारित वेळ: 07:45 वाजता
लागू होण्याची तारीख : 01.06.2025 रोजी आणि त्यानंतर
रेल्वे क्रमांक 12128 पुणे – सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस
पुण्याहून सध्याची प्रस्थानाची नियोजित वेळ : 17:55 वाजता
प्रस्थानाची सुधारित वेळ: 17:50 वाजता
लागू होण्याची तारीख : 01.06.2025 रोजी आणि त्यानंतर
रेल्वे क्रमांक 16381 पुणे – कन्याकुमारी एक्सप्रेस
पुण्याहून सध्याची प्रस्थानाची नियोजित वेळ: 23:50 वाजता
प्रस्थानाची सुधारित वेळ: 23:45 वाजता
लागू होण्याची तारीख : 01.06.2025 रोजी किंवा त्यानंतर
प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना सुधारित वेळेची नोंद घेण्याचा सल्ला रेल्वे विभागाने दिला आहे. हे बदल वेळेची अचुकता आणि प्रवाशांना सुरळीत रेल्वे सेवा मिळाव्या या उद्देशाने लागू केले आहेत.