इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये महिंद्रा ग्रुपच्या विस्तारीकरणासाठी जागेची गरज व त्याबाबत असलेल्या अडचणी, उद्योगांसाठी जागा मिळण्यास होणारा विरोध या विषयावर चर्चा होऊन जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यात यावे, नवीन उद्योग आल्यास रोजगार निर्मिती, शहर व जिल्ह्याचा विकास होतो, आर्थिक विकास व पायाभूत विकास होण्यास चालना मिळते. तसेच राज्याचा व देशांच्या विकासात भर पडते. त्यासाठी उद्योग विकासाला चालना मिळावी, उद्योगांना जागा मिळावी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असून महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने निमा, आयमा व सर्व औद्योगिक संघटनांसमवेत महाराष्ट्र चेंबर सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) नाम. ललित गांधी अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) नाम. ललित गांधी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यात उद्योगांसाठी उपलब्ध जागा व नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी सुरु असलेल्या प्रक्रियेची माहिती प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांच्याकडून जाणून घेतली. उद्योगांना जागा उपलब्ध करून देण्यास, उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांना सहकार्य करावे असे सांगितले.
सुरवातीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) नाम. ललित गांधी यांचा सत्कार व स्वागत केले. तसेच नव्याने पदभार स्वीकारलेल्या प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांचा सत्कार अध्यक्ष ललित गांधी यांनी केला.
याप्रसंगी उपाध्यक्ष संजय सोनवणे, माजी उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, विजय बेदमुथा, निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी चर्चेत सहभाग घेऊन उद्योगांना जागा मिळणे हि गरज असून जागा मिळण्यास विरोध होऊ नये त्यासाठी एकत्रित व सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, माजी उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, विजय बेदमुथा, कृषी व ग्रामविकास समितीचे चेअरमन राजाराम सांगळे,महाराष्ट्र चेंबरचे उत्तर महाराष्ट्र शाखा को चेअरमन भावेश मानेक, संजय राठी, निमाचे उपाध्यक्ष के एल राठी, खजिनदार राजेंद्र वडनेरे, कार्यकारणी सदस्य हेमंत कांकरिया, श्रीधर व्यवहारे, श्रीकांत पाटील, रतन पडवळ, कैलास पाटील, सचिन कंकरेज, सहायक सचिव अविनाश पाठक आदींसह उद्योजक उपस्थित होते.