सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

CBSEचा मोठा निर्णय यंदा १०वी व १२वीच्या परीक्षा अशा होणार

by India Darpan
जुलै 6, 2021 | 5:46 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
CBSE e1658468165387

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोनामुळे केवळ उद्योग आणि व्यवसायावर वाईट परिणाम झाला असून शैक्षणिक क्षेत्रावर देखील याचा मोठा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज अद्यापही बंदच असून ऑनलाईन पद्धतीने बाल वर्गापासून ते कॉलेजपर्यंत शिक्षण सुरू आहे.
शाळा-कॉलेज उघडण्याची शक्यता असतानाच आता तिसरी लाट येण्याच्या भीतीने शैक्षणिक संकुले अद्यापही कुलूप बंदच आहेत. त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यास अडचण निर्माण झाली. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षात २०२१-२२ मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सीबीएससी बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
     शैक्षणिक अभ्यासक्रम अंतर्गत मूल्यांकन आणि प्रकल्प कार्य अधिक विश्वासार्ह आणि वैध बनविण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे. शैक्षणिक सत्राप्रमाणे जुलै २०२१ मध्ये अधिसूचित होणाऱ्या बोर्ड परीक्षा व अभ्यासक्रमाचे तर्कसंगत नियोजन केले जाणार आहे. अभ्यासक्रम आयोजित करण्याबाबत एनसीईआरटी कडून वैकल्पिक शैक्षणिक वेळापत्रक आणि माहिती देखील शाळा वापरणार आहेत.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी विशेष मूल्यांकन योजना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केली. या व्यवस्थेमध्ये शैक्षणिक सत्र दोन सत्रांमध्ये विभागले गेले आहे. येत्या शैक्षणिक सत्रासाठी अभ्यासक्रम तर्कसंगत करण्याची आणि अंतर्गत मूल्यांकन व प्रकल्पातील कामांना अधिक ‘विश्वासार्ह’ आणि ‘कायदेशीर’ करण्याची योजना मंडळाने जाहीर केली आहे.
        सीबीएसई संचालक (शैक्षणिक) जोसेफ इमॅन्युएल यांच्या अधिकृत आदेशानुसार, पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात येईल. तर दुसरी टर्म परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ मध्ये प्रस्तावित आहे. या बाबत माहिती देताना इमॅन्युएल म्हणाले की, शैक्षणिक सत्र २०२१-२२  चा अभ्यासक्रम संकल्पना व विषयांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन पद्धतशीर दृष्टिकोनानुसार विषय तज्ज्ञांनी दोन अटींमध्ये विभागला जाईल. तसेच बोर्ड प्रत्येक टर्मच्या शेवटी द्विविभाजित अभ्यासक्रमाच्या आधारे परीक्षा होईल.
शैक्षणिक सत्राच्या शेवटी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमन धोरणानुसार, अंतर्गत मूल्यांकन, व्यावहारिक, प्रकल्प कार्य अधिक विश्वासार्ह आणि वैध बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १४ तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या १५० च्या आत

Next Post

भाजपची गांधीगिरी! विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच भरवले प्रतिअधिवेशन

Next Post
bjp

भाजपची गांधीगिरी! विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच भरवले प्रतिअधिवेशन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011