नवी दिल्ली – कोरोना महामारीनंतर देशभरात बेरोजगारी वाढली आहे. परिणामी, गुन्हेगारीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. खासकरुन विशेषतः सायबर क्राईमचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. बँकेमधून तसेच एटीएममधून मोठ्या प्रमाणात पैसे चोरीचे गैरप्रकार घडत आहेत.
कॅनरा बँकेचे सर्व्हर बंद करून चोरट्यांनी एटीएममधून सुमारे ३० लाख रुपये काढले. यासाठी चोरीपूर्वी बँकेच्या सर्व्हरसारखी संपूर्ण यंत्रणा ठप्प करण्यात आली. चोरट्यांनी पैसे काढण्यासाठी मुदत संपलेल्या एटीएम कार्डचा वापर केला. त्यामुळे ग्राहक ओळखणे सोपे नव्हते. बँकेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एटीएममधून पैसे काढणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी नायजेरियन असून तो फरार आहे.
पोलीसांनी सायबर क्राईमसाठी तपास चक्रे फिरवली, तेव्हा सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीच्या स्कूटीचा क्रमांक सापडला, मात्र त्या पत्त्यावर पोहोचल्यावर देखील आरोपी सापडला नाही. कारण आरोपीने तीन वर्षांपूर्वी त्या पत्त्यावर स्कूटी खरेदी केली होती आणि आता तो येथून निघून गेला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी वाहनात नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे आरोपीचा सध्याचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता शोधण्यास सुरुवात केली. तांत्रिक पथकाने अथक परिश्रम करून वाहन, फोन आणि गॅस एजन्सींचे रेकॉर्ड तपासले. याद्वारे पोलिसांनी आरोपीच्या पत्त्यावर पोहोचून कृष्ण गोपाल याला अटक केली.
जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी यांनी सांगितले की, ए ब्लॉक ख्याला येथील कॅनरा बँकेच्या एटीएममधून सुमारे ३० लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान, आरोपींनी डेट एटीएम कार्ड वापरून हा गुन्हा केल्याचे उघड झाले.
सर्वप्रथम, आरोपी जिथे सुरक्षा रक्षक नव्हते, असे एटीएम केंद्र शोध होते. त्यानंतर प्री डिव्हाइसला ATM च्या सर्व्हरशी लिंक करत असे, त्यामुळे एटीएमचा सर्व्हर बँकेच्या सर्व्हरवरून खंडित होत असे. डेड कार्ड असल्याने बँकेच्या सर्व्हरने पैसे देण्यास नकार दिला, परंतु डिव्हाइसने त्याची ऑर्डर मशीनच्या सर्व्हरपर्यंत पोहोचू दिली होती. त्यानंतर आरोपी अशा प्रकारे ठराविक रक्कम काढून घेत असे. विशेष म्हणजे या कामात नायजेरियन तांत्रिक मदत करत असे. यात प्रत्यक्ष चोरी करणाऱ्या आरोपींना दहा ते पंधरा टक्के रक्कम मिळायची, तर उर्वरित रक्कम नायजेरियनकडे दिली जात होती.