रोम – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना त्यावर उपाययोजना म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी व संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लशी शोधून काढल्या, तसेच या लशींचा वापर अनेक देशातील नागरिकांसाठी करण्यात येत आहे. परंतु अद्यापही काही नागरिक लस घेण्याबाबत संभ्रमात असून त्यांच्या मनात या विषयी शंका आहेत. इटलीमध्ये कोरोनाची लस घेण्याच्या नावाखाली एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.
कोरोना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी माणसाने कृत्रिम हातावर लस देण्याचा प्रयत्न केला. लस मिळवण्यासाठी बनावट हाताचा वापर केल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. या प्रकाराची माहिती आरोग्य सेविकेने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे आरोपी हा दातांचा डॉक्टर आहे. सदर संशयित आरोपींने लशीकरणास नकार दिल्याने त्याला निलंबितही करण्यात आले आहे.
लस नाकारणाऱ्या रुग्णांना खोटे लसीकरण प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी रेवेना येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आल्याने ही घटना उघडकीस आली. येथील प्रादेशिक सरकारचे नेते अल्बर्ट सिरिओ यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे की, आपल्या संपूर्ण समुदायाने मानवी जीवन, सामाजिक आणि आर्थिक बाबतीत दिलेल्या त्यागामुळे त्या कथित डॉक्टरांची कृती अस्वीकार्य अशी होती.