पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने चार नवे प्रीपेड प्लॅन एकत्रितरित्या सादर केले आहेत. बीएसएनलच्या या प्लॅन्सची किंमत १८४ रुपये, १८५ रुपये, १८६ रुपये आणि ३४७ रुपये आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना हायस्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग तसेच फ्री एसएमएस मिळणार आहेत. बीएसएनएलच्या स्पेशल टेरिफ व्हाउचरअंतर्गत हे प्लॅन सादर केले आहेत. बीएसएनएलच्या या प्लॅन्सची माहिती टेलिकॉमटॉकने दिली आहे.
या प्लॅन्सच्या फायद्याची बाजू पाहिल्यास १८४ रुपयांच्या प्लॅनसोबत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. त्यामध्ये दररोज १०० एसएमएस मिळतील.
१८५ रुपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉलिंग मिळणार आहे. या प्लॅनमध्येही दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. एरिना मोबाइल गेमिंगची सेवा २८ दिवसांसाठी मिळणार आहे.
१८६ रुपयांच्या प्लॅनच्या फायद्याबाबत बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनवर हार्डी गेमवर सेवा मिळते.
बीएसएनएलच्या ३४७ रुपयांच्या प्लॅनमध्येही दररोज १०० एसएमएससह दररोज २ जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे. यामध्ये ५६ दिवसांची वैधतेसह एरिना मोबाइल गेमिंगची सेवा मिळेल.
बीएसएनएलच्या नव्या फ्री डेटाची ऑफर १५ जानेवारी २०२२ पर्यंत आहे. ही माहिती बीएसएनएलने ट्विट करून दिली. एमएनपी केल्यानंतर ग्राहकांना switchToBSNL सोबत ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करावी लागेल. तसेच बीएसएनएलला टॅगही किंवा फॉलो करावे लागणार आहे.