रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रेकॉर्डब्रेक कमाई करीत असूनही ‘पठाण’ चित्रपटातून हटविला तो सीन

फेब्रुवारी 6, 2023 | 3:40 pm
in मनोरंजन
0
pathaan e1674223006417

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले. चित्रपट प्रदर्शित होऊन दुसरा आठवडा सुरू झाला तरी ‘पठाण’ची क्रेज प्रेक्षकांमध्ये कायम आहे. यादरम्यान पठाणमधील एका सीनची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हा सीन मूळ चित्रपटातून हटवण्यात आल्याचा खुलासा लेखकाने केला आहे.

‘पठाण’चे लेखक श्रीधर राघवन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाविषयी बरेच खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितलं, “पठाणच्या ट्रेलरमध्ये तुम्ही शाहरुखचा एक टॉर्चर सीन पाहिला असेल. त्याची खूप चर्चा झाली होती. मात्र आता तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं तर तो सीन तुम्हाला पठाण चित्रपटात दिसला नसेल. चित्रपटाच्या सुरुवातीला शाहरुखच्या एण्ट्रीच्या आधी हा सीन होता. ट्रेलरमध्ये हेच दाखवण्यात आलं आहे. मात्र निर्मात्यांशी चर्चा झाल्यानंतर हा सीन हटवण्यात आला.”

“कॅरेक्टरच्या बॅकस्टोरीच्या आधारावर आम्ही त्या सीनला चित्रपटातून हटवण्याचा निर्णय घेतला. JOCR स्क्वाडच्या प्रत्येक भूमिकेमागे आम्ही मोठी बॅकस्टोरी लिहिली होती. मात्र चित्रपटात याची फारशी गरज नव्हती. अशा प्रकारचे इतरही काही सीन्स होते, जे लिहिले होते, मात्र त्यांना फायनल करण्यात आले नाही”, असं ते म्हणाले. श्रीधर राघवन यांनी हेसुद्धा सांगितलं की शाहरुखने अभिनेत्यासोबत एक लेखक म्हणूनही पठाण चित्रपटासाठी १०० टक्के पूर्णपणे मेहनत घेतली आहे. जेव्हा मी या चित्रपटाची कथा लिहिली तेव्हा शाहरुखनेही ‘पठाण’साठी ७० ते १०० पानी कथा लिहिल्याचे मला कळले, आणि मी चकित झालो.

हॉस्पीटलमध्ये राहून नॉन सर्व्हिस आर्मी अधिकाऱ्याची टीम सेट करण्याची कल्पनासुद्धा शाहरुखचीच होती, असाही खुलासा श्रीधर यांनी केला. इतकंच नव्हे तर शेवटचा सलमान आणि शाहरुखचा सीनसुद्धा श्रीधर यांनी लिहिली नव्हती. “शेवटच्या सीनमध्ये शाहरुख आणि सलमान एकमेकांशी बोलत असतात. हा सीन देखील माझा नाही. माझ्या स्क्रिप्टच्या ड्राफ्टमध्ये तो सीन नव्हता. नंतर तो आदित्य चोप्रा सरांनी लिहिला होता”, असंही त्यांनी सांगितलं.

Bollywood Movie Pathaan Scene Removed

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वयोवृध्द महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले

Next Post

हात उसनवार दिलेल्या पैश्यांची मागणी केल्याने तिघांनी केली एकास मारहाण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

हात उसनवार दिलेल्या पैश्यांची मागणी केल्याने तिघांनी केली एकास मारहाण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011