मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांच्यातील मैत्री, रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप, एंगेजमेंट, विवाह वादविवाद, भांडणे आणि ब्रेकअपच्या बातम्या वारंवार येतच असतात. काही रसिकांना या बातम्यामध्ये खूपच इंटरेस आणि उत्सुकता वाटते. परंतु काही वेळा या बातम्या निराधार असून त्या अफवा ठरतात, तरी त्याची चर्चा सुरूच राहते. सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आज सकाळपासून समोर येत आहेत.
या बातमीने अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्याचे सुरू केले आहे सोशल मीडियावर देखील या संदर्भात उलट सुलट आणि जोरदार चर्चा सुरू आहे आहेत. वास्तविक कारण म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून एकत्र दिसले नव्हते आणि त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
दोघांमध्ये मतभेद होऊ नयेत आणि लवकरच दोघांनीही अशा बातम्यांवर मौन सोडावे, अशी मागणी चाहते करत होते. अर्जुन कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रेकअपच्या बातमीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अर्जुनने लिहिले की, ‘ आमच्यात अफवांना जागा नाही. तुम्ही सुरक्षित रहा आणि आनंदी व्हा, सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम व्यक्त करतो. अर्जुन कपूरच्या या पोस्टवर बॉलीवूडशी संबंधित अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या असून दोघांच्याही आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
अर्जुन कपूरप्रमाणे मलायका अरोरानेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अद्याप काहीही पोस्ट केलेले नाही. परंतु अभिनेत्री मलायकाने अर्जुनच्या पोस्टवर हार्ट इमोजी बनवून स्पष्ट केले आहे की, तिच्या बाजूनेही सर्व काही ठीक आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तरीही लग्नाच्या बातम्यांवर दोघेही नेहमीच मौन बाळगतात, मात्र लवकरच दोघेही शुभमंगल सावधान करून सात फेरे घेऊ शकतात, असे मानले जात आहे. सध्या त्यांच्या चाहत्यांसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोघे वेगळे झालेले नाहीत. याचा काही जण आनंद व्यक्त करीत आहेत.