पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – बीएसएनएल म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी वेगवेगळ्या प्लान मोबाईल बाजारात आणत असते, यामुळे मोबाईल धारकांना बीएसएनएलच्या प्लॅन विषयी अधिक आकर्षण वाटते. कारण त्यामध्ये कमी दरात अधिक सोयीसुविधा मिळतात. बीएसएनएलचानवीन प्लॅन बाजारात आला आहे. हा नवीन प्रीपेड प्लॅन 197 रुपयांना सादर करण्यात आला आहे. हा प्लॅन Jio (Reliance Jio) आणि Bharti Airtel आणि Vodafone-Idea (Vi) पेक्षा खूप चांगला आहे. बाजारात दैनंदिन 2 GB डेटासह 150 दिवसांची वैधता असलेला दुसरा प्लान शोधून, तुम्हाला तो मिळणार नाही. BSNL च्या 197 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल तपशीलवार जाणून घेऊ या…
सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणजेच बीएसएनएलने 197 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 150 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 2 GB हायस्पीड डेटा दिला जात आहे. याशिवाय यूजर्सना मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळते. हा प्लॅन BSNL प्री-पेड रिचार्ज वेबसाइटवर सूचीबद्ध केला गेला आहे. बीएसएनएलचा 197 रुपयांचा प्लॅन काही नियम आणि अटींसह येतो. BSNLच्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. परंतु 18 दिवसांनंतर वेग मर्यादा 40Kbps इतकी कमी होईल, जी 150 दिवस सुरू राहील. या दरम्यान यूजरला फ्री इनकमिंग कॉल मिळत राहतील. पण आउटगोइंग कॉल्ससाठी, तुम्हाला टॉपअप प्लॅनची आवश्यकता असेल. याशिवाय यूजरला मोफत एसएमएसची सुविधा मिळत राहील.