मुंबई – आधुनिक काळात अनेक तरुणांचे अत्याधुनिक कार घेण्याचे स्वप्न असते. विशेषत: आकर्षक आणि दणकट बॉडी असलेली बीएमडब्ल्यू सारखे वाहन आपल्याकडे असावे, अशी त्यांची अपेक्षा असते. बीएमडब्ल्यू कंपनीने ग्राहकांचे स्वप्न पूर्ण करण्याची योजना आणली आहे. जर्मन लक्झरी कार निर्माता बीएमडब्ल्यू कंपनीने सांगितले की, BMW 2 सीरीज ग्रॅन कूप लिमिटेड एडिशनचा एक विशेष प्रकार 220i ‘ब्लॅक शॅडो’ भारतात लॉन्च केला आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नवीन 220i ‘ब्लॅक शॅडो’ व्हेरिएंट चेन्नईस्थित कारखान्यात तयार केले जात आहे.
BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पवाह म्हणाले, “BMW 2 सिरीज ग्रॅन कूप लिमिटेड एडिशन ही या सणासुदीची खास भेट आहे. ‘ब्लॅक शॅडो’ एडिशन आता नवीन पेट्रोल प्रकारात तयार करण्यात आली आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना शैली आणि कामगिरीसह नवीन अनुभव अनुभवण्याची संधी आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे BMW 220i ब्लॅक शॅडोच्या केबिनमध्ये ड्रायव्हर-केंद्रित उच्च श्रेणीची उपकरणे लावली गेली आहेत. समोर एक मोठा पॅनोरामा ग्लास सनरूफ आहे. यात 3D नेव्हिगेशन, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि 10.25-इंच कंट्रोल डिस्प्लेसह BMW लाइव्ह कॉकपिट प्रोफेशनल आहे.
तसेच यात 2.0-लिटर चार-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिनसह सुसज्ज, BMW 220i ब्लॅक शॅडो 190 hp जनरेट करते, जे फक्त 7.1 सेकंदात 0 -100 km/h वरून वेग वाढवते. तसेच हे 190 bhp पॉवर आणि 280Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच, यात 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. BMW ग्रुपने भारतात 2 सीरीज ग्रॅन कूप शॅडो एडिशन 43.50 लाख रुपये किंमतीत लाँच केली आहे. चेन्नई प्लांटमध्ये बनवलेले हे वाहन ब्रँडच्या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे. मात्र एम स्पोर्ट लाइन व्हेरियंटपेक्षा ते 1.6 लाख रुपये जास्त महाग आहे.