इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरात गुरुवारी रात्री करवा चौथचा सण साजरा झाला. मात्र, राजस्थानच्या उदयपूर येथील भाजप खासदार अर्जुनलाल मीणा हे सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय बनले आहेत. भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांनी आपल्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथचा सण साजरा केला. खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या दोन्ही पत्नी या बहिणी आहेत. एका पत्नीचे नाव राजकुमारी तर दुसऱ्या पत्नीचे नाव मीनाक्षी आहे.
भाजप खासदारांच्या पत्नींचे व्यवसाय वेगळे आहेत. राजकुमारी या शिक्षिका आहेत तर मीनाक्षी गॅस एजन्सीच्या मालक आहेत. करवा चौथच्या दिवशी खासदार मीणा आपल्या दोन्ही पत्नींसोबत सण साजरा करतानाचा फोटो सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. अनेकांनी त्यांना खुपच नशिबवान म्हटले आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये खासदार अर्जुनलाल मीणा आपल्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथचा सण साजरा करत आहेत. अर्जुनलाल मीणा हे राजस्थानमधील २५ खासदारांपैकी एक आहेत. २०१४ च्या मोदी लाटेत ते खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उदयपूरच्या जनतेने मीणा यांना संसदेत निवडून दिले आहे.
यंदा १३ ऑक्टोबर या दिवशी करवा चौथचा सण होता. या दिवशी हिंदू स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास करतात. पाणीही प्राशन करीत नाहीत. रात्री चंद्र पाहिल्यानंतर पतीची पूजा करतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथ हा सण साजरा केला जातो.
BJP MP Celebrate Karava Chauth with Two Wives