India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे ठराव

India Darpan by India Darpan
July 23, 2022
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन युतीतून जन्माला आलेल्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष कार्यकर्त्यांना त्यागाचा आदर्श घालून देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आजच्या भाजपाच्या प्रदेश भाजपा कार्यसमितीत मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

प्रदेश कार्यसमिती बैठक आज पनवेलच्या आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. याबाबत माहिती देताना आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले की,आजच्या बैठकीत तीन प्रस्ताव संमत झाले, राजकीय, कृषी विषयक आणि ओबीसी राजकीय आरक्षण हे तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

राजकीय प्रस्ताव मांडताना गेल्या अडीच वर्षात मविआ सरकारने राज्यात केलेल्या अधोगतीवर चर्चा करण्यात आली. भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रस्ताव मांडला तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातील शिवसेनेने केलेला उठाव व स्थापन झालेल्या सरकारचे अभिनंदन करण्यात आले.

या सरकारने तीस दिवस पुर्ण होण्या आधीच इंधन दर कपात, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना प्रोत्साहन असे वेगवेगळे निर्णय घेतले तर संभाजी नगर, धाराशिव , लोकनेते दि.बा. पाटील विमानतळाचे नामकरण असो वा गणेशोत्सव, दहीहंडी व मोहरम सारख्या सणांचा निर्णय घेतले. ज्या गतीने सरकार काम करत आहे. पहिल्या तीन कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र हिताच्या निर्णयांची मालिका शिंदे – फडणवीस सरकारने घेतली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन या ठरावात करण्यात आले.

स्वतंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमित्ताने घर घर तिरंगा या अभियानासह सशक्त बुथ यंत्रणा,आगामी निवडणुकांसाठी भाजपाची व्यूहरचना,ज्या बूथवर कमी मतदान झाले, त्याठिकाणी मतदान वाढवण्यासाठी काम करणार,ग्राम पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत हा विचार घेऊन संघटनात्मक रचना याबाबत सविस्तर चर्चा ही यावेळी करण्यात आल्याची माहिती आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

BJP Maharashtra Executive body meet Decisions


Previous Post

दिंडोरी – विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणा-यावर कारवाई होणार; जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश

Next Post

हभप रामदास महाराज यांच्या नावाने पुरस्काराची राज्य शासनाची घोषणा; मनमाडला जल्लोष (व्हिडीओ)

Next Post

हभप रामदास महाराज यांच्या नावाने पुरस्काराची राज्य शासनाची घोषणा; मनमाडला जल्लोष (व्हिडीओ)

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group